हिंदी मालिकेतील छोटी “विरा” आता झालीय खूप मोठी, दिसते खूपच सुंदर आणि ग्लॅमरस…
मित्रहो अनेक मालिकांतून बालकलाकार आपल्या कलेची दाद मिळवत असतात, शिवाय आपल्या निरागस अभिनयातून प्रचंड लोकप्रियता देखील प्राप्त करत असतात. त्यांना फार कमी वयात ग्लॅमरस इंडस्ट्री मध्ये काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कलाकारांना सुद्धा त्यांचा हेवा वाटतो. त्यांच्या बोबड्या बोलीचे आणि अतिउत्कृष्ट अभिनयाचे विशेष कौतुक वाटते. अशीच एक बालकलाकार जिने आपल्या लहान वयात आपल्या अदाकारीने सर्वाना वेड लावले होते, तिची भूमिका आजदेखील लोक आवडीने पाहतात.
२०१२ ते २०१५ दरम्यान एक मालिका पडद्यावर प्रदर्शित होत होती, या मालिकेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. “एक वीर की अरदास विरा” ही मालिका व याचे कथानक विशेष गाजले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र लक्षवेधी ठरले होते, या प्रत्येक पात्रामध्ये एक गाजलेले व निरागस सौंदर्याची पायरी चढत आता सौंदर्याचे खान बनलेले आहे. छोट्या पडद्यावर ही मालिका तुफान गाजली असून, भरगोस यश या मालिकेने संपादन केले आहे. मालिकेतील आणखी एक मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघ अनेकांच्या मनात घर करून आहे.
आपण जर मालिकेचा आणखी एक मनोरंजनीय भाग पाहिला तर यामध्ये एक बालकलाकार मनोरंजन करताना दिसून आली होती , तिचे नाव हर्षिता ओझाने असे आहे. हर्षिता लहानपणी दिसायला खूपच निरागस आणि सुंदर होती. तिच्या प्रत्येक शब्दाला रसिकांची उत्सुकता जोडली जात होती. त्यामुळे एक लोकप्रिय बालकलाकार म्हणून तिची आजदेखील ख्याती आहेच. बालिश पणाच्या उंबरठ्यावर असतानाच कलेची उत्तम जान ठेवून तिचे सादरीकरण करणे काही सोप्पे नसते पण हर्षिताने हे काम आनंदाने पार पाडले होते.
View this post on Instagram
या मालिकेत तिने मस्तीखोर विराची भूमिका साकारली होती, नंतर मालिका संपल्यावर ही विरा कुठे गेली? किंवा आता काय करते? हे जाणून घेण्यासाठी रसिक मंडळी, चाहते खूप उत्सुक असतात. पडद्यावर ,झळकलेली ही लहान विरा आता खूप मोठी झाली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी खूप सक्रिय असते. त्यामुळे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच काहीसे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. एक उत्तम अभिनेत्री तर ती आहेच पण तिला त्याच बरोबर गायनाची देखील प्रचंड आवड आहे.
हर्षिता कलाविश्वात खूप सक्रिय आहे, तिच्यामध्ये अनेक कला आहेत. तिला गायन येते, अभिनय येतो पण तिला या कलाविश्वात तिचे करिअर करायचे नाही असे तिने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. मात्र तिच्या लहानपणीच्या विरा मोठी झालेलं पाहून तिचे अनेक चाहते थक्क झाले आहेत, अनेकजण तिला कमेन्ट करून तिची विचारणा करत आहेत. पुढेही हर्षिता मनपसंत वाटा मिळत जावो व आयुष्यातील स्वप्नांची नवी बहार उमलत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.