झी मराठी वाहिनीवर सध्या एक नवी मालिका प्रसारित झाली आहे ती म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. या मालिकेतून या सिरियलच्या नाईकने अर्थात अभिनेत्री शिवानी नाईक छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. शिवानी या मालिकेत ‘अपर्णा सुरेश माने’ची भूमिका साकारत आहे. आज आपण या लेखात तिच्याबद्दल जाणून घेऊया..
शिवानी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने विविध शैलींमध्ये तिच्या कामासह तिचे अष्टपैलुत्व प्रदर्शित केले आहे आणि तिच्या कामगिरीसाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिवानीने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे.अभिनयासह शिवानी ही उत्कृष्ट ढोलवादन करते.अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळा विषय घेऊन आली आहे.
ती आजवर अनेक मराठी चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. शिवानीचा जन्म १० ऑक्टोबर १९९५ रोजी मुंबईत झाला. शिवानी अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम विद्यार्थी होती. तिने B.Com केले आहे. तिला अभिनयासोबत वाचणे आणि लिहिणे प्रचंड आवडते असे तिने या आधी सांगितले होते.
चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील तिच्या कामाव्यतिरिक्त, शिवानीने रंगमंचदेखील गाजवला आहे. प्रवीण पाटेकर दिग्दर्शित मॅट्रिक तर २०१७ साली अखंडसारख्या अनेक नाटकांमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी ने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले.
दरम्यान, अप्पी आमची कलेक्टर ही मालिका एक मनोरंजक कथा सांगणार आहे. अपर्णा सुरेश माने उर्फ अप्पी ही मुलगी आहे, ती एका गावात राहते, जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. अप्पीचे स्वप्न मोठे असून तिला कोणाचेही मार्गदर्शन नाही. आर्थिक समस्या आणि शैक्षणिक आणि सामाजिक अडचणी असतानाही ती कलेक्टर बनते आणि सर्वांसमोर आदर्श ठेवते.
तिच्या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी तिच्या गावातील जिल्हाधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, मुलाखतीनुसार ती म्हणाली, “टीव्हीच्या प्लॅटफॉर्मवर काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे. अनेकांवर मात करणाऱ्या मुलीची भूमिका मी साकारणार आहे.खूप आनंद झाला कारण मी एका समर्पित मुलीची भूमिका साकारणार आहे. आणि ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देईल.”
शिवानी नाईक या मालिकेच्या एका भागासाठी १२,००० रुपये इतके मानधन आकारते. तर ही होती आपली अप्पी अर्थात शिवानी नाईक. दरम्यान, मालिकेत ती आपले ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करत आहे. ती आपले ध्येय कसे गाठेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.