माझी तुझी रेशीम गाठ मालिकेचा शेवटचा भाग शूट करताना चाहते झाले भावूक… एकत्र जेवण करून केली कार्यक्रमाची सांगता..

छोटया पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका सध्या बंद होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नेहा आणि यश यांच्या नात्याची ही सुंदर प्रेम कहाणी आता आपल्या उत्तरार्धात येऊन पोहोचली आहे. या बातमीने मालिकेच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

यश आणि नेहाच्या प्रेमकहाणी मध्ये परीच्या निरगसतेने चार चाँद लावले.पण अचानकपणे नेहाच्या पहिल्या नवऱ्याच्या येण्याने मालिका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सतत अविनाश सिम्मीसोबत मिळून नेहाच्या आयुष्यात अडथळे निर्माण करत आहे. यामुळे मालिकेत नवनवे ट्विस्ट येत आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हा प्रेक्षकांची आवडती मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यश व नेहाच्या प्रेमाची कथा सांगणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

दरम्यान, मालिकेचा शेवट जवळ आल्याने कलाकार देखील मालिकेचा शेवटचा भाग शूट करत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडियो प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडियो क्लिप मध्ये मालिकेची स्टार कास्ट एकत्र जेवण करत असताना दिसून येत आहेत. यावेळी सर्वजण भावूक झालेले दिसून आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swati Pansare (@swatipansareofficial)

दार उघड बये ही मालिका येत्या 19 सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि 17 सप्टेंबरला माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्यामुळे माझी तुझी रेशीमगाठी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे कन्फर्म झाले आहे.

या मालिकेतील यशचा मित्र आणि खऱ्या अर्थाने यश नेहाच्या प्रेमकहाणीत दुवा बनलेल्या समीरची भूमिका साकारणार संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं समीर आणि यशच्या शेवटचा सीन शूट झाल्याचं प्रेक्षकांना सांगितलं. यावेळीचे फोटो शेअर करत त्यानं एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.

संकर्षणने लिहिले, बाय बाय यश समीर. काल आम्ही यश आणि समीर म्हणुन “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतला शेवटचा सीन शूट केला.

मला माझ्या मित्राची , यशची ..माझ्या पात्राची , समीरची .. आणि त्यांच्या अफ्फलातून मैत्रीची कायम आठवण येत राहील .. I LOVE YOU @shreyastalpade27 दादा..I miss you ही दोस्ती तुटायची नाय ..(खूप बोलायचंय .. सांगायचंय.. सविस्तर लिहिनच..) यश आणि समीरच्या मैत्रीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील भावूक होऊन कॉमेंट्स केल्या आहेत.

Image credit:MarathiWorldEntertainment

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप