भारतीय फलंदाजाने वर्ल्ड कपपूर्वीच देश सोडला, आणि वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी परदेशी संघात पदार्पण केले.

विश्वचषक: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. विश्वचषक संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंची निराशा झाली आहे. यामुळे काही खेळाडूंचे चाहते सोशल मीडियावर संघाच्या निवडीवर बरेच प्रश्न विचारत आहेत, दरम्यान, 21 वर्षीय भारतीय फलंदाजाने परदेशात जाऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

 

साई सुदर्शनने कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला २१ वर्षीय युवा भारतीय फलंदाज साई सुदर्शनने नुकतेच सरेकडून काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. साई सुदर्शनने नुकत्याच संपलेल्या इमर्जिंग आशिया कप खेळल्यानंतर इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

साई सुदर्शनने नुकतेच सरेसोबत सप्टेंबर महिन्यात होणारे काउंटी सामने खेळण्यासाठी करार केला आहे. नुकताच तो सरेकडून पहिला कौंटी सामना खेळला. सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत होणाऱ्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या टीम इंडियामध्ये साई सुदर्शनचा स्टँड बाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

साई सुदर्शनची टीम इंडियाच्या संघात निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. साई सुदर्शनचा अलीकडचा फॉर्म खूपच जबरदस्त आहे. नुकत्याच झालेल्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेतही त्याने टीम इंडियासाठी सलामी देताना 4 डावात 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.

साई सुदर्शन आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. साई सुदर्शनने 2022 साली आयपीएलमधून करिअरला सुरुवात केली. साई सुदर्शनने गुजरातसाठी आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. सुदर्शनने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 46.1 च्या सरासरीने फलंदाजी करताना 507 धावा केल्या आहेत.

सुदर्शनने यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये महेंद्रसिंग धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 96 धावांची शानदार खेळी खेळली होती.

Leave a Comment

Close Visit uttamsheti