नव्या जोषात होणार बिग बॉस सिझन ४चा ग्रँड प्रीमियर.. हे नियम बदलणार

छोटा पडदा आणि रियालिटी शो हे नात आता दृढ होत चाललं आहे. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठी रिएलिटी शोने प्रेक्षकांच्या घरातच नाहीतर मनातही चांगलेच स्थान निर्माण केले आहे. हा शो प्रत्येक चाहता आवडीने पाहिला जातो. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कधी सुरू होणार याबाबतच्या चर्चने सोशल मीडियावर जणू त्सुनामी च आली आहे. पण अखेर आता या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे, कारण बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा ग्रॅण्ड प्रीमियर 2 ऑक्टोबरला होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नुकतंच महेश मांजरेकर यांनी तारखेची घोषणा केली. सोशल मीडियावर त्यांचा नवा प्रोमो दाखल झाला आहे.

महेश मांजरेकरांनी बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. “100 दिवसांचा हा खेळ, कधी पास, कधी फेल. पण महेश सरांच्या मते, यंदा ‘All is well’ पाहायला विसरू नका “BIGG BOSS मराठी” Grand Premiere 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम – शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर!

असं म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनच्या प्रीमियरची घोषणा करण्यात आली. गेले कित्येक दिवस याबाबात अंदाज बांधले जात होते. मात्र, बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकरांनी स्वत: ही घोषणा करत सगळ्याचं चर्चांना पूर्णविराम दिला.

दरम्यान, गेल्या सिझन मध्ये काही नियमांना अनुसरून काही अटींची तरतूद करण्यात आली होती. पण आता कोरोनाचे संकट टळले असल्याने काही बदल करण्यात आले आहेत.

बिग बॉसचं घर पूर्णपणं अत्याधुनिक सुखसोयींनी परिपूर्ण असतं. कधीही बिग बॉसच्या घराच्या किंमत किती आहे हे कधीच उघड केलेलं नाही.

दरम्यान, तिसऱ्या पर्वामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना घरात जाण्यापूर्वी १५ दिवस क्वारंटाईन व्हावे लागले होते. पण यावेळी मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळं चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी गेल्यावर्षीसारखे कोणतेही नियम नसणार आहेत. फक्त घरात प्रवेश करण्यापूर्वी स्पर्धकांना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला येत्या २ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाचा पहिला भाग संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे इतक्या प्रतीक्षेनंतर हा शो पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक असल्याचे पहायला मिळत आहे.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप