मालिकेतला भंकसपणा पाहून प्रेक्षक भडकले! “लवकर ही मालिका बंद करा” या शब्दात नोंदवला निषेध!

फार पूर्वीपासून छोटा पडदा हा रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. छोट्या पडद्यावरील विविध वाहिन्यांवर वेगवेगळे विषय घेऊन अनेक मालिका सुरू असतात, यातील काही मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतात तर अनेक मालिका या पटकथेमध्ये माती खाताना दिसतात! परिणामी या मालिकेच्या टीआरपी मध्ये कमालीची घट होताना दिसते. काही वर्षांपूर्वी आलेली श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. याचे मुख्य कारण म्हणजे यात अतिशय रंजक पद्धतीचे कथानक दाखवण्यात आले होते. त्यामुळे या सिरीयलचा चाहता वर्ग हा वेगळाच होता, मात्र आता गेल्या काही काळापासून अनेक मालिका या प्रेम- प्रकरण, विवाहबाह्य संबंध यावरच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या मालिकांना प्रेक्षक अगदी वैतागले आहेत. आता देखील एका सिरीयलच्या बाबतीत असाच प्रकार घडताना दिसत आहे.

 

‘रंग माझा वेगळा’ असे या सिरीयलचे नाव आहे. या सिरीयल मध्ये आपल्याला दीपा आणि कार्तिक या जोडीची कथा पाहायला मिळत आहे. या मालिकेत हर्षदा खानविलकर याही एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत.

परंतु आता रंग माझा वेगळा या सिरीयल वर प्रेक्षक भरपूरच भडकले असून, आता लवकरच ही मालिका बंद करा असा नाराजीचा सूर प्रेक्षक वर्गाकडून उमटताना दिसत आहे.

या मालिकेमध्ये आशुतोष गोखले या अभिनेत्याने कार्तिकची भूमिका साकारली आहे तर रेश्मा शिंदे या अभिनेत्रीने दिपाची भूमिका साकारली आहे.

मालिकेचे टीआरपी वाढवण्यासाठी त्यात वेळोवेळी अनपेक्षित वळण लेखक आणि दिग्दर्शकाकडून आणण्यात येत असतात. काही वेळेस हा बदल प्रेक्षकांना आवडतो तर काही वेळेस आवडत नाही. त्याचबरोबर यातील एखाद्या पात्राला जर रिप्लेस केले तर ते देखील प्रेक्षकांना पसंत पडत नाही, त्यावेळी देखील ते नाराज होऊन जातात. स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेली रंग माझा वेगळा या सिरीयलचा नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

या प्रोमो मध्ये कोर्टात सौंदर्या ही साहेबांना म्हणत असते की ‘दीपिका हीच दिपाची मुलगी आहे’ हे ऐकल्यावर जजसाहेब प्रतिक्रिया देतात की ‘दीपिका आणि दीपा या दोघींची डीएनए टेस्ट करा’ मालिकेचा हाच प्रोमो पाहून आता प्रेक्षक मात्र यावर भलतेच भडकलेले आहेत. एका प्रेक्षकाने तर “किती तो पांचटपणा” या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तर “एकच विषय किती दिवस खेचत राहणार आहात आपण? पुढे काही विषय मिळत नसेल तर मालिकाच बंद करून टाका!” असं एका प्रेक्षकाने म्हटले आहे. ”मागच्या वेळेस डीएनए रिपोर्ट श्वेता हीने बदलला होता, नंतर आयषा बदलेल असे करत करत ही मालिका दोन ते तीन वर्षे पुढे खेचत जाणार!” “किती तो फालतूपणा दाखवणार?” असे देखील काही प्रेक्षकांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Close Visit uttamsheti