‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेतील अभिनेत्रीने केले खास श्रावण स्पेशल फोटोशूट.. फोटो पाहून चाहते झाले घायाळ..

0

सध्या सर्वत्र श्रावणाचा हंगाम सुरू झाला आहे. सुंदर अशा हिरवळीने सर्वांचे मन मोहले आहे. याचा परिणाम टिव्ही जगतातील कलाकारांवर दिसून येत आहे. अनेक कलाकार श्रावण स्पेशल फोटोशूट करून ते पोस्ट करत आहेत. मग यासाठी अभिनेत्री कशा मागे राहतील. छोट्या पडद्यावर सध्या आघाडीवर असणारी स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे काय असत. या मालिकेने प्रेक्षकांना जणू वेड लावले आहे. या मालिकेतील मनू तुम्हाला माहीतच असेल. तिने सध्या आपल्या बहारदार फोटोशूटने चाहत्यांना वेड लावले आहे. तुम्ही पाहिलात का तिचा श्रावण स्पेशल लूक?

लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी कासार सध्या ‘सुख म्हणजे नक्की असते’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.या मालिकेत ती मानसीची भूमिका साकारत आहे.अश्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नुकतेच तिने श्रावण स्पेशल फोटोशूट केलं आहे.श्रावण स्पेशल फोटोशूटसाठी अश्विनीने खास जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती.साजेसा मेकअप आणि केसांत गजरा माळून पारंपारिक लूक केला होता.फोटोसाठी विविध पोझही अश्विनीने दिल्या आहेत.श्रावण महिन्यातील निसर्गाप्रमाणेच अश्विनीचं सौंदर्यही खुलून दिसत आहे.तिचे हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashwini Kasar (@ashwinikasar18)

अश्विनीने ‘सावित्रीज्योती’, ‘मोलकरीण बाई’, ‘कमला’ अशा मालिकांमधून दमदार भूमिका साकारून अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडल. अनेकदा अश्विनी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अश्विनी कासार हिने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण आणि त्यानंतर अश्विनीने वकिलीचे शिक्षण घेतले. आदर्श विद्यामंदिर शाळेत असताना तिने सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी दर्शवला होता. पुढे कॉलेजमध्ये असताना विविध नाटकांमधून काम करता आले. कमला या मालिकेमुळे अश्विनीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तर सावित्री ज्योती मालिकेत तिने साकारलेली सावित्रीबाईंची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. मात्र टीआरपी न मिळाल्याने ही मालिका अर्ध्यावरच बंद पडली होती. मराठी ऍक्टर्स राउंड टेबल या नावाने सिरीज बनवण्यात आली आहे त्यात अश्विनी कासार महत्वाच्या भूमिकेत झळकली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashwini Kasar (@ashwinikasar18)

अश्विनी कासार हिने कलर्स मराठीवरील कमला या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. अश्विनीने साकारलेली कमला प्रसिद्धी मिळवताना दिसली होती. कट्टी बट्टी, मोलकरीण बाई, सावित्री ज्योती या मालिकेत ती महत्वाच्या भूमिका साकारताना दिसली होती. सावित्री ज्योती मालिकेत तिने साकारलेली सावित्रीबाईंची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप