झी मराठी वाहिनीवर सध्या एका नव्या मालिकेने सर्वत्र खळबळ माजवली आहे. जे तिला दिसणार तेच ती बोलणार या टॅग लाईन सह या मालिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्यात असणाऱ्या अंधश्रद्धा आणि सिक्स्थ सेन्स यांच्यातील फरक स्पष्ट करण्यासाठी खास या मलिकेच्या निर्मात्यांनी नव्या विषयाला हात घातला आहे. दरम्यान, या मालिकेत काही नव्या कलाकारांसह दिग्गज कलाकार देखील काम करत आहेत. ते त्यांच्या या कामासाठी किती मानधन घेतात माहीत आहे का? नाही? चला तर मग जाणून घ्या ..
या मालिकेची सालस अशी नायिका म्हणजे तितिक्षा तावडे. ती या मालिकेच्या एका एपिसोडसाठी १७ हजार इतके मानधन घेते. तिच्याबद्दल बोलायचे तर तिने सरस्वती या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. नंतर तिने ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत तर ‘एक थ्रीलर नाइट’ आणि ‘जयंती’ या सिनेमामधून तितिक्षा प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकतीच तीने सोनी मराठीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेत संत कान्होपात्रा ही व्यक्तिरेखा साकारली होती.
यानंतर मालिकेचा नायक अजिंक्य नानावरे एका एपिसोडसाठी १५ हजार इतके मानधन घेतो.दरम्यान, मालिकेत चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या नारकर देखील काम करत आहेत ती एका एपिसोडसाठी १० हजार इतके मानधन घेते. त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
राहुल एका एपिसोडसाठी ७ हजार रुपये इतके मानधन घेतात. मुग्धा गोडबोले मुद्दा एका एपिसोडसाठी ९ हजार रुपये इतके मानधन घेते. तिने या याधी ठिपक्यांची रांगोळी, अजूनही बरसात आहे मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रणिता आचरेकर प्रणिता एका एपिसोडसाठी ९ हजार रुपये इतके मानधन घेते.
दरम्यान, या मालिके बद्दल सांगायचे तर या मालिकेत तितीक्षा तावडे ही नेत्रा चे पात्र साकारते आहे. नेत्रा ही गावातील एक सामान्य मुलगी. पण तिला असामान्य देणगी मिळाली असते. या नेत्राला त्रिनयना या देवीने भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलेलं असतं. नेत्रा दिव्यशक्तीच्या आधारे भविष्य पाहू शकते.
या दिव्य शक्तीचा वापर तिला लोकांच्या भल्यासाठी करायचा आहे. पण हे करत असताना तिला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. भविष्यात काय होणार, हे जाणणा-या नेत्राला तिला वाईट समजलं जातं, असं या मालिकेचं कथानक असल्याचं कळतंय. ही मालिका एका बंगाली मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जात आहे.