“बिग बॉस सिझन ४” साठी वाढली उत्सुकता, हा अभिनेता करणार सूत्रसंचालन.
मित्रहो मराठी शो “बिग बॉस” सुरुवातीपासूनच लोकप्रिय आहे. यातून अनेक कलाकार रसिकांच्या भेटीस आले असून त्यांच्या स्वभावाची एक खास झलक पाहायला मिळाली आहे. या शोचे१,२,३ सिझन चांगलेच पार पडले आहेत, याची लोकप्रियता आणि प्रसिद्धी भरपूर आहे. अनेक थरारक प्रकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले असून कलाकारांची कला इथे देखील उत्तम सादर झाली आहे. येणारा चौथा सिझन विशेष उत्सुकता वाढवत आहे. नुकताच या सिझनचे सूत्रसंचालन कोण करणार याची माहिती समोर आली आहे. मराठी रंगभूमीवरचा एक खास अभिनेता सूत्रसंचालन करणार आहे.
मराठी पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तेवढाच वादग्रस्त शो म्हणजे “बिग बॉस मराठी” हा आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझन नंतर चौथ्या सिझनची प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागली आहे. यातून कोण कोण कलाकार भेटीस येणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. मित्रहो या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझन मध्ये अनेक वादग्रस्त घटना समोर आल्या आहेत. आता चौथ्या सिझन मध्ये उमेदवारांसाठी कोणकोणते अवघड टास्क असतील याबाबत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे यामध्ये टास्कला सामोरे जाण्यासाठी कोण कोण कलाकार असतील याची देखील चर्चा सुरू आहे.
“बिग बॉस मराठी” चे सर्व चाहते याच्या पुढील भागासाठी नजरा खिळवून बसले आहेत. यातून त्यांच्या आवडीचे कलाकार पडद्यावर पुन्हा झळकणार का याची उत्सुकता लागली आहे. सोबतच महेश मांजरेकर यांची कणखर झलक पाहताना रसिक मंडळी भलतेच खुश व्हायचे. या बाबतीत खूपशा चर्चा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सोबतच आता या शोमध्ये सूत्रसंचालनच्या बाबतीत देखील खास भाष्य केलं जात आहे. महेश मांजरेकर यांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळली होती, त्यांच्या भारदस्त आवाजाची प्रेक्षकांना देखील सवय झाली होती.
मात्र आता या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनसाठी पडद्यावर नवीन कलाकार भेटीस येणार आहे. महेश मांजरेकर यांनी सिझन चारला होस्ट करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या सिझनला कोण होस्ट करणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. बिग बॉस मराठीचे तीन सिझन आतापर्यंत महेश मांजरेकर यांनी सांभाळले होते, पण आता चौथ्या सिझनची धुरा अभिनेता सिद्धार्थ जाधव हा पकडणार असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे. तो आता “बिग बॉस मराठी ४” याला होस्ट करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे सर्व चाहते देखील खूप खुश झाले आहेत.
अभिनेता सिद्धार्थ जाधव हा आजवर अनेक चित्रपटात दिसला आहे, खूपशा हिंदी चित्रपटात सुद्धा त्याला पाहिले आहे. पण चित्रपटात रसिकांचे मनोरंजन करणारा सिद्धार्थ आता रियालिटी शोच्या माध्यमातून पडद्यावर भेटीस येणार आहे. तो मराठी रंगभूमीवरील एक आघाडीचा अभिनेता आहे. तो “बिग बॉस मराठी ४” चा निवेदिता म्हणून दिसू शकतो. पण अजूनही सिद्धार्थ कडून याबाबतीत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.