बातमी !…”बनवाबनवी” चित्रपटातील या कलाकाराचे झाले निधन…सर्वत्र पसरली शोककळा….

मित्रहो मराठी रंगभूमीवर गाजलेला चित्रपट “अशी ही बनवाबनवी” अजरामर झाला आहे. या चित्रपटातून खूपसे कलाकार प्रसिद्ध झाले आहेत, त्यांच्या कलेची एक खास जादू पडद्यावर पाहायला मिळाली आहे. यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, सिद्धार्थ रे यांसारखे नामवंत कलाकार होते. त्यांनी आपल्या अतरंगी भूमिकेतून चित्रपटाला प्रचंड लोकप्रिय बनवले आहे. यातील प्रत्येक डॉयलॉग, गाणी , सिन, कथानक प्रचंड गाजले आहे.आजही या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.

 

मित्रहो नुकताच या चित्रपटात काम केलेल्या एका कलाकाराचे निधन झाले आहे, या चित्रपटातून अनेक चेहरे पडद्यावर झळकले होते. काही चेहरे पुढे निघून प्रसिद्ध झाले तर काही चेहरे काळाच्या पडद्याआड गेले. यातीलच एक चेहरा जो या चित्रपटात एक आकर्षक रूप घेऊन आला होता, तो चेहरा आहे अभिनेता सिद्धार्थ रे याचा. सिद्धार्थ हा कलाविश्वात गाजलेला अभिनेता आहे. आजवर हिंदी, मराठी चित्रपटात त्याच्या अनेक भूमिकांनी पडद्यावर हजेरी लावलेली दिसली आहे. सर्वच भूमिका प्रचंड गाजल्या आहेत.

सिद्धार्थ याने “अशी ही बनवाबनवी” या चित्रपटात शंतनूची भूमिका पार पाडली होती. हा शंतनू मराठी पडद्यावर भलताच प्रसिद्ध झाला आहे, या भूमिकेने त्याला रसिकांच्या मनात आजही कायम ठेवले आहे. मराठी चित्रपटातून त्याने भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. अनेक भूमिका विशेष गाजल्या आहेत, मात्र बॉलिवूड मधील त्याला “बाजीगर” या चित्रपटातून प्रचंड ओळख मिळाली होती. हिंदी कलाविश्वात सुद्धा त्याचा हा चित्रपट प्रचंड जादू करून गेला आहे. या चित्रपटातील सिद्धार्थची भूमिका खूप आकर्षक आहे.

मराठी चित्रपटातुन लोकप्रियता मिळवल्यावर सिद्धार्थने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. हिंदी कलाविश्वात देखील त्याने अनेक चित्रपटात काम केले होते, पण “बाजीगर” चित्रपटातून तो पडद्यावर ओळखिस आला. या चित्रपटात त्याने पोलिसाची भूमिका पार पाडली होती. हा चित्रपट पुर्ण झाल्यावर सिद्धार्थ हळूहळू पडद्या पासून दूर झाला. अनेक वर्षे तो अभिनयापासून दूर होता. २००० साली त्याने “बिच्छु पिता”,” जानी दुश्मन” या चित्रपटातून पडद्यावर आला होता. त्याच्या यातील भूमिका देखील प्रसिद्ध झाल्या होत्या.

हा कलाकार आपल्या कलेत गुंग असतानाच, २००४ साली सिद्धार्थचे हृदयविकाराने निधन झाले.त्यावेळी तो अवघ्या चाळीस वर्षाचा होता. १९९९मध्ये त्याने शांतीप्रिया सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांनी सिद्धार्थचा हृदय विकाराने मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. त्याचा मुलगा आज चित्रपट सृष्टीत आपले नाव कमवत आहे. त्याला देखील वाडीलांप्रमाणे यश मिळो ही सदिच्छा. सिद्धार्थ जरी आता आपल्या सोबत नसला तरीही त्याच्या भूमिकेतून तो नेहमीच जिवंत राहील. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit uttamsheti