“चला हवा येऊ द्या” मधून हा कलाकार पडला बाहेर, जाणून घ्या यामागील खरे कारण..
मित्रहो मराठी रंगभूमीवर अनेक कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाले आहेत, त्यांच्या माध्यमातून पडद्यावर भेटीस आलेले कलाकार सुद्धा सवयीचे बनलेले असल्याने प्रेक्षक मंडळी देखील खूप मनापासून कार्यक्रम पाहत असतात. असाच एक कार्यक्रम जो प्रेक्षकांना अगदी वेड लावून पडद्यावर झळकत आहे, तोच “चला हवा येऊ द्या” विशेष गाजला आहे. सोशल मीडियावर देखील या कार्यक्रमाची चर्चा सुरू असते, यातुन अनेक कलाकार अतरंगी भूमिकेतून भेटीस आले आहेत. यातील कलाकार हे एका पेक्षा एक आहेत, त्यांच्या अभिनयाची जादू आजवर प्रेक्षकांवर भरपूर झाली आहे.
मित्रहो “चला हवा येऊ द्या” कार्यक्रम चर्चेत आला आहे, यातून एक कलाकार बाहेर पडला आहे. आज या लेखातून आपण कोणत्या कलाकाराने शोमधून काढता पाय घेतला आहे ते जाणून घेऊ. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.याचा प्रत्येक भाग रसिकांना खळखळून हसवणारा आहे, रोजच्या धावपळीच्या जीवनात एक क्षणभर बसून खळखळून हसण्याची संधी मिळते. त्यामुळे हा शो खूप लोकप्रिय आहे, अनेक लोक याचे चाहते आहेत. आयुष्यातील त्रास काही वेळ विसरण्यासाठी हा शो खूप मदत करतो.
हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांसारख्या अनेक कलाकारांसोबत पडद्यावर भूमिका अभिनीत केल्या जात असतात. भूमिकांच्या माध्यमातून हे कलाकार अगदी घराघरात पोहचतात, प्रत्येक कलाकाराने आपापल्या परीने कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत भर घातली आहे. याची लोकप्रियता भरपूर आहे. काही कलाकार तर इतके प्रसिध्द झाले आहेत की जणू चाहत्यांच्या कुटुंबातील सदस्य बनून गेले आहेत. त्यांना पडद्यावर पाहणे ही देखील एक खास आवड बनली आहे.
या कार्यक्रमाच्या बाबतीत एक खास माहिती समोर येत असून हा कार्यक्रम एका कलाकाराने आता सोडला असल्याची चर्चा सुरू आहे. अभिनेता सागर कारंडे आता या कार्यक्रमाला रामराम ठोकणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या कार्यक्रमाचे पुढे काय होणार असा चिंताजनक सूर देखील चाहत्यांनी धरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओ मुळे या चर्चेला उधाण आले आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री श्रेया बुगडे हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता सागर कारंडे कुठेच दिसत नाहीये.
“चला हवा येऊ द्या” या कार्यक्रमाचे सेट लोकेशन बदलण्यात आल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत श्रेयाने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की “तब्बल आठ वर्षांनी नव्या वास्तूत. आजपासून थुकरटवाडीचा श्रीगणेशा, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच नेहमी प्रमाणे राहुद्या.”. तसेच मित्रहो हा व्हिडीओ तर लक्ष वेधून घेत आहेच सोबतच मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सागर हा या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र अजूनही त्याची यावर प्रतिक्रिया आलेली नाही. तर मित्रहो तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.