प्राजक्ता माळीचा तो व्हिडियो होतोय व्हायरल.. हसून झाले चाहते बेहाल..
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या दिलखेच अदांनी नेहमीच सर्वांना घायाळ करते मोहक अदांनी आणि फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिने आपल्या दमदार अभिनयाने आज सिनेसृष्टीत नाव कमावले आहे. तिच्या मोहक सौंदर्यावर अनेक चाहते फिदा झाल्यावाचून राहूच शकत नाहीत.
प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी ती जोडलेली असते. सर्वांना हसवून लोटपोट करणाऱ्या सोनी मराठी चॅनलवरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोची प्राजक्ता होस्ट आहे. आपल्या अभिनय आणि मजेशीर अंदाजात ती या शोचं सूत्रसंचालन उत्कृष्टरित्या करते.
दरम्यान, प्राजक्ता तिच्या सिनेमाच्या शूटिंग साठी लंडन ला गेली होती. त्यासाठी तिने शो मधून सुट्टी घेतली. तेव्हा चाहत्यांनी तिला खूप मिस केले. तिच्याशिवाय शो पाहण्यात ती मजा नाही. प्राजक्ता लवकर परत ये असे अनेक चाहत्यांनी तिने पोस्ट केलेल्या अनेक फोटोज् वर कमेंट केले होते. प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीला सर्वाधिक चित्रपट, नाटक, कॉमेडी शो आणि वेबसिरीज मध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. प्राजक्ता मराठी मालिका जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. तिने साकारलेली मेघना आजही चाहत्यांचे मन चोरण्यात कोणतीच कसर सोडत नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर प्राजक्ताचा एक फनी व्हिडियो व्हायरल होत आहे. जे पाहून चाहते तिचे कौतुक तर करतच आहेत. शिवाय पोट धरून हसत देखील आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शकता प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेट योग करताना दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या एका स्कीटमधील आहे. त्यामुळे आपण प्राजक्तासह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे हे कलाकारही दिसत आहेत.
अनेकदा प्राजक्ता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन योगा करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे ती तिच्या फिटनेटसकडे विशेष लक्ष देते हे कळून येते. शिवाय व्हिडीयो मध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा प्राजक्ता प्रसादला त्याच्या वजनावरुन बोलताना दिसत असून व्यायामाचे महत्त्व पटवून देताना दिसत आहे.यावरून कळते की ती एक फिटनेस फ्रिक आहे.
हास्यजत्राच्या सेटवरील स्कीटदरम्यानचा हा जुना व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम अगदी आवडीने पाहिला जातो. प्राजक्ता मुळे या शोच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसून येते.