“बाबा , काळजी करु नका…” संकर्षण कऱ्हाडेची ती पोस्ट हेरतेय चाहत्यांचे मन…

0

“जिभेवर चवीची गोडी नेहमीच असली पाहिजे”, म्हणत झी मराठी वाहिनीवर आम्ही सारे खवय्ये शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणखी कोण तर तो आहे संकर्षण कऱ्हाडे. आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे त्याने अनेक चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. त्याने नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सोबतच तो सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असतो. चाहते त्याची पोस्ट येण्याची जणू वाटच पाहत असतात. सध्या त्याने केलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. काय आहे ती पोस्ट वाचा.

सध्या नाटकाच्या एका प्रयोगासाठी संकर्षण कोकणात गेला आहे. यावेळी त्याने रत्नागिरीच्या गणपतीपुळ्याच्या मंदिरात त्याच्याबरोबर घडलेला अद्धभूत अनुभव शेअर करत त्यानं ही पोस्ट केली आहे.

“बाबा , काळजी करु नका.. गणपती मला स्वत: घ्यायला येईल ..” (माझा हा अनुभव PLEASE नक्की वाचा.. )मी परवा मुंबईहुन नाटकाच्या कोकण दौऱ्यासाठी निघतांना घरात सहज म्हणालो कि , रत्नागीरीहून २.३० तासावर गणपतीपुळे आहे.. दर्शनाला जाउन येइन. तेंव्हा बाबा काळजीने म्हणाले कि, का धावपळ करतोस..? वेळ मिळालाय तर दिवसभर आराम कर.. त्यात तू जाणार कसा ..? प्रवासाचं काय नियोजन ..?हे विचारल्यावर मी अगदी सहज थाटात म्हणालो कि,“बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वत: घ्यायला येईल ..” आणि घरुन निघालो…..

काल रात्री रत्नागीरीच्या प्रयोगाला गणपतीपुळे देवस्थान चे पुजारी श्री. उमेश घनवटकर प्रसादाचे उकडीचे मोदक घेउन आले.. मला म्हणाले चला दर्शनाला गाडी घेउनच आलोय.. मी म्हणालो पण माझं काही तशी तयारी नाहीये.. शिवाय आमची राहायची सोय चिपळून ला आहे.. तेंव्हा ते म्हणाले रहायची, दर्शनाची, जेवणाची सगळी सोय नियोजन मी करतो.. तुम्ही फक्तं गाडीत बसा आणि चला .. मला माझंच स्वतःचं वाक्यं आठवलं “बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वतः घ्यायला येईल ..” मी रत्नागीरीच्या प्रयोगानंतर त्यांच्या गाडीत बसलो तर अर्थातच समोर गणरायाचा छानसा फोटो ….. काल मध्यरात्री सुखरूप इथे पोचलो … राहाण्याची उत्तम सोय त्यांनीच कोली..

आज सकाळी त्यांनीच मला सोवळं दिलं.. दर्शनाला घेउन गेले.. माझ्या हातून बाप्पाचा अभिषेक केला.. आणि मनसोक्तं खायला घातलं…काल मध्यरात्री सुखरूप इथे पोचलो … राहाण्याची उत्तम सोय त्यांनीच कोली.. आज सकाळी त्यांनीच मला सोवळं दिलं.. दर्शनाला घेउन गेले.. माझ्या हातून बाप्पाचा अभिषेक केला.. आणि मनसोक्तं खायला घातलं .. मी तुम्हाला कसा सांगु ह्या प्रत्येक क्षणांत मला असं वाटत होतं कि हे सगळं गणपती मी उच्चारलेल्या त्या एका वाक्यासाठी माझ्याकडून करवून घेतोय..माझी आई मला माझ्या लहानपणापासून सांगत आलीये कि, “बोलतांना कायम चांगलं बोलावं .. ” मी उच्चारलेल्या त्या एका चांगल्या वाक्यासाठी गणपती बाप्पा ने माझ्यासाठी काय काय केलं…मी खूप भाराऊन गेलोय.. बाप्पा मोरया..

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप