तेजश्री प्रधान च्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबरी आली समोर.. काय आहे जाणून घ्या…
झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका तशा सुपरहिट आहेत. पण त्यापैकी एक म्हणजे होणार सून मी या घरची. श्री आणि जान्हवी या दोघांची जोडी प्रचंड गाजली होती. जान्हवीचे पात्र साकारणारी तेजश्री प्रधान खूपच गाजली होती. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीवर असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ती मानली जाते. सध्या ती चर्चेत येत आहे.
ती आता चर्चेत आली याचे कारण म्हणजे तिचा आगामी चित्रपट.. तेजस्वी प्रधान आणि वैभव तत्ववादी पुन्हा एकदा एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या आधी देखील वैभव तत्ववादी आणि तेजश्री हे झी युवा या वाहिनीवरील एका मालिकेत एकत्र दिसले होते. त्याचबरोबर एक जाहिरात देखील त्यांनी एकत्रित केली होती.
आता या दोघांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांचा सोल्मेट हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव कुंटे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा मात्र अद्याप कळू शकली नाही. पण या चित्रपटामुळे चाहत्यांना तिला मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.
दरम्यान तेजश्री बद्दल बोलायचे तर, तिच्या जान्हवीच्या पात्राने अनेकांना वेडे केले होते. तिला या मालिकेनंतर अनेक मालिका व चित्रपटाच्या ऑफर देखील मिळालेल्या आहेत. या मालिकेच्या आधी तेजश्री प्रधान हिने झेंडा या चित्रपटात देखील काम केले होते. या चित्रपटात तिने संतोष जुवेकरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. याआधी तेजश्री प्रधान हिने मॉडलिंग देखील केले आहे.
तसेच काही जाहिरातींमध्ये काम देखील केलेले आहे. काही नाटकात देखील तिने काम केले आहे. होणार सुन मी या घरची या मालिकेमध्ये शशांक केतकर याने श्रीची भूमिका साकारली होती. ही भूमिका देखील त्या वेळेस प्रचंड गाजली होती. मालिकेतील ही जोडी सर्व प्रेक्षकांना देखील खूप आवडली होती.
त्यांनतर बऱ्याच काळानंतर झी मराठीवर तिची अग बाई सासुबाई ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेमध्ये तिने शुभ्राचे पात्र साकारले होते. तिचे हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. या मालिकेत गिरीश ओक यांची भूमिका होती. तसेच निवेदिता सराफ यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.
तेजश्री आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार असल्याने तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. आणि आता हा चित्रपट केव्हा रिलीज होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.