तारक मेहता…’ फेम ‘अय्यर’ वयाच्या 42 व्या वर्षी करणार लग्न, होणारी पत्नी आहे बबिताहूनही देखणी..

छोट्या पडद्यावर अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. काही काही मालिका तर वर्षानुवर्षे चालू असतात. त्यापैकी एक म्हणजे सोनी सब चॅनलवरील “तारक मेहता का उलटा चष्मा” . मालिकेत दाखवण्यात आलेली एक बहुरंगी सोसायटी, आणि त्यात राहणारे रंगीबेरंगी तर काही अतरंगी लोकं.. विविध प्रांतातील विविध स्वभावाची लोक आणि त्यांच्यात असणारा एकोपा दाखवणारी ही मालिका. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्यात अव्वल आहे. जेठा- दया, भिडे माधवी, तारक अंजली , सोढी रोशन आणि अय्यर बबिता.. या जोड्यानी आजवर चाहत्यांना हसवले आहे. दरम्यान, मालिकेतील अय्यर बद्दल एक दमदार बातमी समोर आली आहे. काय आहे ही बातमी जाणून घ्या…

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत अय्यर ची भूमिका साकारणारा म्हणजेच अभिनेता तनुज महाशब्दे येत्या काळात लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर येते आहे. त्याची होणारी पत्नी कोण? बबिता…? हा प्रश्न उभा ठाकला आहे.

तर वयाच्या ४२ व्या वर्षी तनुजच्या आयुष्यात बहार येणार असल्याचे पहायला मिळणार आहे.

तनुज म्हणजेच ऑनस्क्रीन अय्यरची होणारी पत्नी नेमकी कशी दिसते, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं उत्तर आम्हीही देऊ शकत नाही. कारण, अद्यापही तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. पण, तिच्या रुपाची चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाली आहे. त्यामुळं आता अय्यरची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन पत्नी सुंदर हे तुम्हीच येत्या काळात ठरवा.

ऑनस्क्रीन बबिताच्या सौंदर्याच्या चर्चा राहिल्या दूर, पण तुम्हाला माहितीये का; चर्चा तर अशीही आहे की तनुज आणि मुनमुन खऱ्या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांनीही या अफवा असल्याचं या चर्चा उधळून लावल्या आहेत. दरम्यान, मुनमुन चे नाव राज अनाडकट शी जोडण्यात आले होते. आणि आता तिच्या आणि तनुज च्या रिलेशन बाबत अफवा समोर येत आहेत. आता ही केवळ एक अफवा आहे की खरी बातमी हे येता काळच ठरवेल.

गेल्या १४ वर्षांपासून या प्रत्येक पात्र आणि प्रेक्षक जोडले गेले आहेत. मालिकेत दाखवण्यात येणारी अय्यर आणि जेठालाल यांची होणारी तू तू मै मै प्रेक्षकांना पहिल्या दिवसापासून हसण्याचे काम करते. आणि आणखी एक रंजक बाब म्हणजे या मालिकेसाठी तनुजची निवड पटकथा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करण्यात आली होती. पण, जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर मालिकेत ‘अय्यर’ हे पात्रही जोडलं गेलं आणि मालिकेत आणखी एक खास एंट्री झाली. जी आजतागायत सर्वांना खळखळून हसवत आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप