मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने शेअर केला एक व्हिडिओ…..मुलांसोबत मस्ती करतानाचा हा व्हिडीओ….

मित्रहो मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची झलक दाखवून अनेकांना प्रेमात पाडणारा स्वप्नील नेहमीच काही ना काही कारणाने लक्ष वेधून घेत असतो. सोशल मीडियावर सुद्धा तो प्रचंड सक्रिय असतो, त्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा रंगायला फार वेळ लागतच नाही. नुकताच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे. शिवाय नेटकऱ्यांना आणखी एक चर्चेसाठी विषय मिळाला असून त्यावर ते कार्यरत झालेले आहेत.

 

या व्हिडीओ मध्ये खास लक्षवेधी ठरली आहेत ती म्हणजे स्वप्नीलची दोन्ही मुले मायरा आणि राघव. बाप आणि मुलं यांच्यातील नातं आणि यातील प्रेम आभाळाच्या उरात देखील न सामावणारे असते. बाप घरी संध्याकाळी जेव्हा दमून येतो तेव्हा आपल्या पिलांना पाहिल्यावर त्याचा थकवा नाहीसाच होतो. त्यांची किलबिल ऐकण्यासाठी तो दिवसभर आतुर झालेला असतो त्यामुळे जेव्हा ते जवळ येऊन गोंजारतात तेव्हा बापालाच लहान असल्यासारखे वाटते. आपल्याच पिलांचा तो मित्र बनतो.

असाच एक व्हिडिओ स्वप्नील ने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तो म्हणतो की “शूटिंग करून कितीही कंटाळून घरी आल्यावर जर अस स्वागत होणार असेल तर अजून काय पाहिजे आयुष्यात…” पुढे तो म्हणतो की “गेल्या काही दिवसापासून मी घरी आल्यावर एक प्रकार घडत आहे आणि आज तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. माहीत नाही आज तो प्रकार घडेल का, पण कदाचित घडेल. ” पुढे स्वप्नील दार उघडतो व त्याला पुन्हा मायरा आणि राघव यांच्या कडून खास चिठ्ठी स्वप्नीलला मिळते. अस व्हिडीओ मध्ये दिसून येते.

जेव्हा स्वप्नील रोज रात्री शूटिंग पूर्ण करून घरी पोहचतो आणि आतमध्ये जाण्यासाठी दारावरची बेल वाजवतो तेव्हा त्याची मुलगी मायरा आणि मुलगा राघव दार उघडतात. पुढे स्वप्नील आतमध्ये आला की मुले त्याच्या हातावर एक चिठ्ठी ठेवतात.पुढे त्या चिठ्ठी मध्ये स्वप्नील कुतूहलाने पाहतो, त्यावर जे काही लिहलेले असते ते या व्हिडीओ मध्ये त्याने शेअर केले आहे. मायरा स्वप्नीलच्या हातात एक छोटी चिठ्ठी देते, ज्यावर लिहलेले असते की “वेलकम बॅक टू होम..आय लव्ह यू..” मुलांनी लावलेला असा हा जीव एक बाप या नात्याने स्वप्नीलला खूप छान वाटत आहे.

त्याच्या या व्हिडीओ वर चाहत्यांनी भरपूर कमेन्ट केली आहे, अनेकजण आपले पितृ प्रेम देखील व्यक्त करत आहेत. स्वप्नील एक अभिनेता म्हणून प्रचंड गाजलेला आहे, त्याने मुंबई-पुणे-मुंबई, दुनियादारी, मितवा, प्यार वाली लव्हस्टोरी, भिकारी यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार अभिनय करून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. पुढेही त्याला अशीच लोकप्रियता व मुलांकडून प्रेम मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit uttamsheti