‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून मराठी कला विश्वास दमदार पदार्पण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे स्वानंद टिकेकर! अभिनेता उदय टिकेकर यांची ही लेक. स्वानंदीच्या वडील मराठी सिनेविश्वातील एवढे नावाजलेले कलाकार असताना देखील स्वानंदीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आज सिनेसृष्टीत आपलं हक्काचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे! सध्या स्वानंदी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे या मालिकेत काम सुरू असताना आता तिला लॉटरी देखील लागली असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे!
विशेष म्हणजे एकच वेळी स्वानंदीला यावेळी दोन बंपर लॉटरी लागल्याचं दृश्य दिसत आहे! एकीकडे तिला ‘सुंदरा मनामध्ये भरली’ यासारखी लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर दुसरीकडे तिच्या दारात एक ब्रँड न्यू कार आली आहे. स्वानंदीने स्वकष्टाच्या कमाईतून नवीन गाडी खरेदी केली आहे. दरम्यान आपल्या सोशल मीडिया हँडलवर सक्रिय असणाऱ्या स्वानंदीने ‘माय ब्युटी माय बिस्ट’ असं सुंदर कॅप्शन देत तिच्या नवीन गाडीचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. स्वानंदीने काळ्या रंगाची स्कोडा कार खरेदी केली असून, नवीन गाडी घरात येतात स्वानंदीने तिच्यासोबत एक मस्त राईड ही घेतली आहे. याचेही फोटो तिने तिच्या सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये शेअर केले आहेत. स्वानंदीच्या नवीन गाडीची ही पोस्ट पाहिल्यावर अनेक कलाकारांनी तसेच तिच्या चाहत्यांनी देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
सध्या सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका रंजक वळणावर आली आहे आणि याच वळणावर अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हीची या मालिकेत एंट्री होणार आहे. स्वानंदी यात वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. दिल दोस्ती दुनियदारी या मालिकेनंतर बऱ्याच दिवसांनी स्वानंदीला अभिनय करताना पाहण्याची पर्वणी तिच्या चाहत्यांना मिळणार आहे.
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिलाषा ही भूमिका करणाऱ्या राधा सागर हिने नुकतीच मालिकेतून एक्झिट घेतली आहे. आता स्वानंदी या मालिकेत येणार या बातमीने मालिकेला नवं वळण येण्याची शक्यता आहे.