कार्यक्रम ठरला भेटीचं कारण… आणि सुरू झाली सुयश आयुशीची भन्नाट लव्हस्टोरी.. माहिती आहे का कशी झाली या गोड नात्याची सुरुवात ? जाणून घ्या

मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे.. लग्नानंतर ही जोडी नेहमीच चर्चेत येत असते. सोशल मीडिया दोघंही अ‍ॅक्टिव्ह असतात.दोघंही एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओज आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतात. या स्वीट कपलचे अनेक भन्नाट व्हिडीओ, गोड सुंदर फोटो तुम्ही पाहिले असतील पण या जोडप्याची लव्हस्टोरी कशी सुरू झाली ते, तुम्हाला माहितीये का?

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुयशने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. त्याची शांत पण लक्षवेधक देहबोली आणि अजोड अभिनय यामुळे तो अगदी घराघरात पोहोचला. तो सध्या एक लोकप्रिय अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. आणि आपल्या या हिरोच्या खऱ्या आयुष्यात त्याच्या हिरोईनची एंट्री झाली ती म्हणजे २०१८ साली.,

२०१८ साली ‘श्रावण क्वीन’ या स्पर्धेत आयुषी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आणि सुयश या कार्यक्रमात त्याच्या एका मालिकेचं प्रमोशन करायला गेला होता. या कार्यक्रमात सुयशने आयुषीला पहिल्यांदा पाहिलं. त्यांच्या भेटीचे निमित्त ठरली ती म्हणजे ही स्पर्धा.. खरंतर सुयशला आयुषी पहिल्याच नजरेत आवडली होती. पण आयुषीच्या तर सुयश इतका मोठा अभिनेता आहे हे तिच्या ध्यानीमनीही नव्हत. श्रावण क्वीन या स्पर्धेत तशी नावापुरतीच ओळख झाली होती पण त्यानंतर वर्षभर दोघांचही एकमेकांशी काहीही कोणताच सबंध असा आलाच नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayushi Bhave Tilak (@aayushitlk)

पण म्हणतात ना प्रेम काही केल्या लांब राहू शकत नाही. तर मग वर्षभरानंतर पुन्हा आयुषी व सुयश भेटले… योगायोग की नियती ते पुन्हा भेटले ते श्रावण क्वीन स्पर्धेच्या सेटवरच. कारण यावेळी सुयश या कार्यक्रमाचा होस्ट होता तर आयुषीला माजी विजेती म्हणून या कार्यक्रमात बोलावणं आलेलं. यावेळी मात्र आता त्यांची चांगलीच ओळख झाली. मग दोघांनीही एकमेकांना इन्स्टावर फॉलो केलं.सुरुवातीला इन्स्टावर दोघांचंही बोलणं सुरू झालं. अर्थात पुढाकार सुयशनेच घेतला होता. हळहळू गप्पा सुरू झाल्या. मग मैत्री झाली आणि मग एकदिवस दोघांनी भेटायचं ठरवलं. गणपतीच्या काळात दोघांची ही पहिली भेट झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

याबाबत सुयश सांगतो,” एका कार्यक्रमात आम्हा दोघांची पहिली भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आमच्यात चांगली मैत्री झाली. हळूहळू आमच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. तिच्या आणि माझ्या आवडीनिवडी जवळपास सारख्या आहेत. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित पुण्यातील माझ्या घरी साखपरपुड्याचा कार्यक्रम झाला.” यापुढे तो म्हणाला, “मला आणि आयुषीला आमच्या खासगी आयुष्याविषयी कोणाला सांगायचे नव्हते. कारण याविषयी कळताच लोकांनी भूतकाळाविषयी बोलायला सुरुवात केली असती. आयुषी ही फार समजूतदार आहे. तिला गोष्टी समजवाव्या लागत नाहीत.”

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप