उद्योगपती ललित मोदींला डेट करणारी बॉलीवूड सुंदरी सुष्मिता सेन खऱ्या आयुष्यात आहे एवढ्या संपत्तीची मालकीण, जाणून व्हाल थक्क..

बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि माजी मिस युनीवर्स असलेली गोड चेहऱ्याची अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेली दिसत आहे! भारतीय उद्योगपती ललित मोदी यांनी सुष्मिता सोबत त्यांचे काही वैयक्तिक क्षणातील खाजगी फोटो शेअर करत आपण दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा मोठा खुलासा सोशल मीडिया मार्फत केला आहे!

 

याचा अर्थ म्हणजेच ४६ वर्षीय सुष्मिता सेन आणि ५६ वर्षाचे ललित मोदी एकमेकांसोबत डेटिंग करत आहेत. ललित मोदी यांनी ट्विट करत याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. यावरूनच असे लक्षात येते की उद्योगपती ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. ललित मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. त्यात दोघे ही खुपच आनंदी दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

सुष्मिता सेन आजही तिच्या निखळ सौंदर्याबद्दल आणि आणि कमाई बद्दल अनेक अभिनेत्रींना मागे टाकण्यात यशस्वी ठरली आहे. आजच्या या लेखात आपण या अभिनेत्रीच्या एकूण संपत्ती बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

बॉलीवूडच्या चंदेरी दुनिया मध्ये सुष्मिता सेन आजही एका यशस्वी गुणी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र असे असले तरी सुश्मिता सेन अनेकदा तिच्या वैयक्तिक यामुळे सतत चर्चेत राहिलेली दिसते, कधी रिलेशनशिप तर कधी ब्रेकअप या दोन गोष्टींमुळे सुश्मिता नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

काही दिवसांपूर्वीच रोहमन शॉल सोबतच्या ब्रेकअप मुळे ती चर्चेत आली होती, तर आता उद्योगपती ललित मोदींसोबतच्या असलेल्या रिलेशनशिप मुळे ती सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा भाग बनली आहे.

सुष्मिताच्या अनेक फॅन्सला तिच्या नेटवर्थ बद्दल कमालीची उत्सुकता लागलेली आहे. याआधी सुश्मिता सेनने चित्रपट आणि वेब सिरीज या दोन्हीच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे! वयाच्या १८ व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब मिळवणारी सुष्मिता सेन आजला कोट्यावधी रुपयांची मालकीण झालेली आहे! सुश्मिता महिन्याला जवळजवळ ६० लाखांपर्यंतची कमाई करते, तर एका चित्रपटासाठी ती ३ ते ४ कोटी एवढं मानधन घेते. टीव्हीवर झळकणाऱ्या तिच्या जाहिरातींच्या माध्यमातून ती तब्बल १.५ कोटी पर्यंतची कमाई करते! सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुश्मिताची सध्याची संपत्ती एकूण ७४ कोटी इतकी आहे!

सोशल मीडियावर ललित मोदींनी सुश्मिता करिता खास पोस्ट ही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी सुष्मितासोबत नवीन जीवनाची सुरुवात करत असल्याचे स्पष्ट केले आहे. या पोस्ट मध्ये सुष्मितासाठी ललित मोदी यांनी betterhalf असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला सुरुवात होत वेगवेगळ्या प्रश्नांना उधाण आले आहे.

Leave a Comment

Close Visit uttamsheti