‘फु बाई फु’ फेम सुप्रिया पाठारे यांचा मुलगा अभिनय क्षेत्रात न येता करत आहे हे काम..

आज-काल हिंदी सिनेसृष्टी असो किंवा मराठी त्यातील कलाकारांची मुलं आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत या चंदेरी दुनियेत दाखल होताना दिसतात! मात्र मराठी चित्रपट सृष्टीतील खूपशा कलाकारांची मुलं याला अपवाद ठरली आहेत! मराठीमधील सुप्रसिद्ध वाहिनी स्टार प्रवाह या वरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे! आतापर्यंत या मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेत टॉप ५ मध्ये आपले स्थान कायम राखून ठेवण्यात यश मिळवले आहे! या मालिकेतील माधवी कानिटकर म्हणजेच माईची भूमिका अभिनेत्री सुप्रिया पाठारे या साकारत आहेत. मराठी सृष्टीत आजवर विविधांगी भूमिका सुप्रिया पाठारे यांनी साकारल्या आहेत.

 

सतत रडणाऱ्या काकूबाई भूमिकेपेक्षा खलनायकी आणि विनोदी ढंग असलेल्या भूमिकेत त्या जास्त रमताना दिसतात. ‘मोलकरीण बाई’ ‘श्रीमंता घरची सून’ ‘फु बाई फु’ ‘जागो मोहन प्यारे’ ‘बाळकडू’ अशा विविध प्रकारच्या चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी सृष्टीला एक भरीव योगदान देण्यात सुप्रिया पाठारे यांना नक्कीच यश मिळाले आहे!

सुप्रिया आपल्या वैयक्तिक आयुष्या बद्दल अथवा आपल्या कुटुंबाबद्दल त्या फारशा कधी बोलताना दिसत नसल्या तरी त्यांची लहान बहीण अर्चना नेवरेकर या मराठी चित्रसृष्टीत आपला जम बसवण्यात चनगल्याच यशस्वी झाल्या होत्या! सुप्रिया सांगतात, त्यांचे बालपण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जात असताना त्यांनी कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून लोकांच्या घरची धुनीभांडी देखील एकेकाळी केली होती. आता तो काळ बराच मागे गेला असला तरी आठवणींच्या कोपऱ्यात या आठवणी अजूनही तशाच जपून राहिल्या आहेत. स्वतःच्या कष्टाने आणि मोठ्या हिमतीने या दोघी बहिणींनी मराठी सृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला दिसतो.

असे असले तरी आता मात्र त्यांचा मुलगा मिहीर पाठारे याने अभिनय क्षेत्रात येण्यापेक्षा आपल्या आवडीच्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिहीर हा व्यवसायाने शेफ आहे. संजीव कपूर यांच्या खानाखजाना या कार्यक्रमामध्ये देखील तो सहभागी झाला होता. तसेच त्याने काही काळ अमेरिकेत देखील शेफ म्हणून काम केले आहे. असे असले तरी मिहीर आता मायदेशी परतला आहे आणि इकडे येताच त्याने स्वतःच्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय देखील सुरू केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MIHIR PATHARE (@mihir_pathare)

महाराजा असे त्याच्या या नवीन हॉटेल व्यवसायाचे नाव असून यात जिभेचे चोचले पुरवणाऱ्या खवय्यांना त्याच्या हातची स्पेशल पाव भाजी देखील चाखायला मिळणार आहे! दिनांक १४ जुलै रोजी त्याच्या या नूतन व्यवसायाची सुरुवात झाली असून, अनेक मराठी सेलिब्रिटींनी देखील मिहीरला याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे ठाण्यामधील खाद्यप्रेमींसाठी ही एक नवीन पर्वणीच ठरली आहे!

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameya Mhatre (@mhatre.ameya)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिहीर पाठारे आणि त्याचा मित्र आदेश या जोडीने ठाण्यात महाराजा या नावाचा फूड ट्रक सुरू केला आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन आधुनिक पद्धतीने बनवलेल्या राईस आणि पावभाजी या पदार्थांचा समावेश त्याने आपल्या फूडट्रक केला आहे.

Leave a Comment

Close Visit Np online