‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील या अभिनेत्रीने घेतली पोलिसात धाव.. काय घडले वाचून थक्क व्हाल..
चित्रनगरी जितकी आकर्षक तितकीच रिस्की देखील आहे. इथे जितकी प्रसिद्धी मिळते तितकीच ती टिकवून ठेवताना अनेक अडचणी देखील समोर येतात. आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर कलाकारांना खूप जपून वागावे लागते. अनेकदा ट्रोलींग ला देखील सामोरे जावे लागते. असच काहीस सध्या कलर्स वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील
अभिनेत्री पूजा पुरंदरेसोबत घडते आहे. तिलासुद्धा ‘सायबर अब्युझिंग’ला सामोरं जावे लागले आहे. इतकेच नव्हे तर हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पूजा पुरंदरेने स्वतः आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत खुलासा केला आहे. यासोबतच सर्वांना खास विंनतीदेखील केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून काही जणांकडून सोशल मीडियाचा गैरवापर होतोय की काय? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
अभिनेत्री पूजाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, ‘गेल्या काही दिवसांपासून मला इन्स्टाग्रामवर अनेक मेसेज आणि पोस्ट टॅग्स मिळत आहेत. एका विशिष्ट अकाउंटवरुन मला स्टोरीला किंवा पोस्टला टॅग केले जात आहे. जे खूप निंदनीय,अपमानास्पद आणि धमकीवजा होते. सुरुवातीला मी या गोष्टीला हलक्यात घेतले, त्याकडे दुर्लक्ष केले. मला वाटले की या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे हेसुद्धा काही परिणाम आहेत.
ती पुढे म्हणाली की, ‘मला वाटतं प्रत्येकाने कधी ना कधी ट्रोलिंगसारख्या प्रकाराचा सामना केला असेल. परंतु काल मी फारच निराश झाले. मला प्रचंड दु:ख झालं आणि मी ठरवलं. आता आणखी या सर्व गोष्टी सहन करायच्या नाहीत. मी मोठा निर्णय घेत त्या व्यक्ती विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कारण त्या व्यक्तीने माझी इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अभिनेत्रीने आवाहन करत म्हटलं अशा गोष्टी सहन करु नका. स्वतःबद्दल बोला आणि नेहमी आनंद पसरवत राहा’
दरम्यान ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत काम केल्यानंतर पूजा पुरंदरे स्टार प्रवाह वरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत झळकली आहे.अभिनेत्री पूजा पुरंदरे हिने आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली आहे. नाटक करत असताना तिला टीव्ही वरील जाहिरातीसाठी विचारण्यात आले. ती जाहिरात केल्यानंतर आपण अभिनय क्षेत्रातच आपल करियर करायच असं तिने ठरवलं.
View this post on Instagram
अभिनेत्री पूजा पुरंदरे हिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेपूर्वी सुंदर माझ घर या मालिकेत गायत्रीची नकारात्मक भूमिका साकारली होती. त्याशिवाय किती सांगायचे मला या मालिकेत उर्मीची आणि नकुशी या मालिकेत मृण्मयीची भूमिका साकारली आहे.
आता ती सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत कामिनीची नकारात्मक भूमिका साकारत आहे.