सुमित पुसावळेची बायकोआहे भलतीच सुंदर.. नेटकऱ्यानी कौतुकाचा केला वर्षाव..

0

कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच सुमीत पुसावळे. तो मालिकेत बाळूमामाच्या मुख्य भूमिकेत अगदी उठावदार दिसतो. त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात पक्के स्थान निर्माण केले आहे. त्याने चाहत्यांना सरप्राइज देत एक गुडन्यूज दिली आहे. आता सुमित लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकताच सुमितचा साखरपुडा पार पडला आहे. अभिनेत्याने त्याच्या साखरपुड्याच्या दिवशीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर करत ही खुशखबर चाहत्यांना दिली. त्याच्या या फोटोज्वर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच सुमितने त्याच्या प्रिवेडींग शूटचा एक फोटोही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrishikesh Kshirsagar [HK] 🇮🇳 (@hk_clicks)

सुमीतची सोशल मीडयावर देखील फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे. चाहते सतत त्याच्यावर प्रेम व्यक्त करत असतात. सुमितने शेयर केलेल्या फोटोजवर कमेंट करत नेटकऱ्यानी सुमीतच्या देखण्या बायकोचं सर्वांनी कौतुक केलं आहे.

मोनिका असं सुमीतच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे.लवकरच दोघे लग्न करणार आहेत.सुमीत आणि मोनिकाची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली आहेसुमीतच्या सगळ्या चाहत्यांनी दोघांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देत मोनिकाचं कौतुक केलं आहे.

सुमितने आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं. आता सुमित लवकरच विवाहबंधनात अडकायला सज्ज झाला आहे. त्याने १६ नोव्हेंबर रोजी एक पोस्ट करत आपल्या नात्याची कबुली दिली होती. त्याने होणाऱ्या पार्टनरचा हात हातात घेतलेला एक फोटो शेअर करत म्हटलं होतं, ‘जेव्हा तुम्ही पळून जायला खूप उशीर करता.’ त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव मोनिका आहे. त्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी त्याने होणाऱ्या पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात ते दोघेही दाक्षिणात्य वेषभूषेमध्ये दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, ‘तिचा हात पकडणं हा तर एक बहाणा होता, खरं तर नशिबाच्या रेषांना एकमेकांशी जोडायचं होतं.’ आता त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

दरम्यान, लहानपणापासूनच शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण घेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने त्याला कलाक्षेत्राची ओढ लागली. मुंबईला गेल्यावर त्याला हिंदी चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. सरगम या चित्रपटातुन तो झळकला होता. त्यानंतर लागीरं झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून तो प्रकाशझोतात आला. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून मुख्य भूमिका साकारून सुमित पुसावळे हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप