अखेर बाळूमामाला मिळाली त्यांची रियल लाईफ सत्यवा.. बाळूमामा फेम अभिनेता सुमित पुसावळे अडकला लग्नबेडीत..

0

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.. या कवितेच्या पंक्ती प्रमाणे साध्य मनोरंजन क्षेत्रात जिकडे बघाव तिकडे लग्नाची धामधूम पहायला मिळत आहे. हा महिना वर्षाचा शेवट महिना असला तरी काही लोकप्रिय कलाकारांच्या आयुष्याची सुरुवात करणारा ठरला आहे. दरम्यान, छोटया पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नानंतर बऱ्याच कलाकारांचे लग्नसोहळे आणि साखरपुडे पार पडले. या यादीत बाळूमामा फेम सुमित पुसावळे याचेही नाव दाखल झाले आहे.

सोशल मीडियावर सध्या त्याच्या लग्नाच्या फोटोज् आणि व्हिडिओज नी तुफान माजवले आहे. मोनिका सोबत तो आता लग्न बेडीत अडकला आहे. त्याचा हा दिमाखदार लग्नसोहळा सांगोला येथे अगदी थाटमाट पार पडला असून या लग्नाला त्याच्या सहकलाकारांनी, मित्र मंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती.

तर सोशल मीडियावर मराठी सेलिब्रिटींनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केलेला पहायला मिळत आहे. दरम्यान, आदल्या दिवशी हळदीचा समारंभ पार पडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.ज्यामध्ये त्याने मोती कलरचा कुर्ता परिधान केला आहे आणि डोक्यावर मुंडावळ्या पहायला मिळत आहेत. तर मोनिकाने हळद रंगाची साडी परिधान केली होती. एकमेकांना पूरक असा साज करत या दोघांनी एकमेकांना हळद लावली.याबाबतचा एक फोटो सुमितने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर करत ” असे कॅपशन दिले आहे.

त्यानंतर लग्न सोहळ्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मोनिकाने हिरव्या रंगाची साडी, त्यावर नवरीला साजेसे दागिने परिधान केले आहेत तर तिला मॅच होणारी पांढरी शेरवानी आणि त्याला हिरवे काठ असा लूक करत सुमीतने लग्नाची गाठ बांधली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोज् व्हिडिओज मध्ये त्यांचा एक उत्कृष्ट असा वेस्टर्न लूक पहायला मिळतो आहे. ज्यामध्ये करड्या रंगाचा वनपिस ड्रेस परिधान करून मोनिका अतिशय सुंदर दिसते आहे तर सुमित ने त्याच रंगाचा थ्री पीस सुट परिधान केला असून तो देखील हँडसम दिसतो आहे. दोघांनी एंट्री घेत कपल डान्स केलेला देखील आढळले आहे.

अभिनेता सुमीत पुसावळे याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. लागिर झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे. बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळतो आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.

Leave A Reply

Your email address will not be published.