सुख म्हणजे काय असत मालिकेला मिळणार नवे वळण.. गौरी देणार गोड बातमी.

0

स्टार प्रवाह वहिनीवरील सुख म्हणजे काय असतं मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे मालिका टीआरपी मध्ये एक नंबरला आहे.सध्या मालिकेला सध्या वेगळंच वळण लागलं आहे. मालिकेतील गौरी आणि जयदीप यांच्या नात्याची सुंदर कहाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. अलीकडेच गौरी शिर्के पाटलांच्या घराची खरी वारसदार आहे हे सत्य समोर आले आहे. आणि हे समजल्यावर त्यांच्या घरात प्रचंड उलथापालथ झाली आहे. सगळ्या नात्यांचे अर्थ सध्या बदलले आहेत. जयदीप सध्या स्वतःला शिर्के पाटलांच्या घरात वेगळं समजू लागला आहे. तसेच त्याला शालिनी आणि इतर लोकही तो शिर्के पाटलांचा नाही हे जाणवून देत आहेत.

या सगळ्याचा परिणाम आता गौरी आणि जयदीपच्या नात्यावरही होत आहे. शिर्के पाटलांच्या घरात कळलेल्या सत्यामुळे येणाऱ्या काळात गौरी आणि जयदीपमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पण गौरीने परिस्थिती सांभाळून घेत त्यांच्या नात्याची घडी पुन्हा एकदा सावरली. पण आता दोघांमध्ये तिसरा पाहुणा येणार असल्याची चाहूल लागली आहे.

सुख म्हणजे काय असतं मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे येणाऱ्या काळात मालिकेत एक पॉझिटिव्ह ट्रॅक पाहायला मिळणार आहे. मालिकेत गौरीला दिवस जाणार असून शिर्के पाटलांच्या घरात नवीन सदस्याचे आगमन होणार आहे. सध्या सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यानुसार गौरी आणि जयदीप शिर्के पाटलांचं घर सोडून जात असतात. मध्येच माई त्या दोघांना अडवते आणि त्यांना घर सोडून जाण्यामागचं कारण विचारते. तेवढ्यात गौरी चक्कर येऊन खाली पडते. तेव्हा डॉक्टर गौरी गरोदर असल्याचं सगळ्यांना सांगतात. त्यामुळे शिर्के पाटील कुटुंबीय सध्या आनंदात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

खरंतर शिर्के पाटलांच्या घरात गौरीचे सत्य समोर आल्यापासून शालिनी जयदीपचा अपमान करण्याचा एकही चान्स सोडत नाही. शालिनीनेच आता रक्मिणीलाही जयदीपविरुद्ध भडकावलं आहे. रुक्मिणी जयदीप अजूनही शिर्के पाटलांच्या घरात का राहतोय म्हणून त्याचा अपमान करते. त्यामुळे स्वाभिमानी जयदीप घर सोडून जात आहे. त्याच्याबरोबर गौरीही निघाली होती. पण आता गौरीने दिलेल्या गोड बातमीमुळे येत्या काळात गौरी आणि जयदीप शिर्के पाटलांच्या घरातच राहणार कि घर सोडून जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

मालिकेतील या वळणांमुळे ही मालिका आणखीन रंजक वाटत आहे.त्यामुळे पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आणि म्हणूनच आगामी भागात मालिकेत काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप