अमिताभ, सलमान यांच्यासोबत काम करणाऱ्या या तरुणीची आज अशी झाली आहे अवस्था, विकते रस्त्यावर मोमोज..
लॉकडाऊन एक सर्वांच्या आयुष्यात आलेला काळ होता ज्यातून सामान्यच काय दिग्गज सुद्धा वाचू शकले नाहीत. या काळात अनेक कोट्यवधी लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. यावेळी अडचणीच्या वेळी आपल्या प्रियजनांपासून दूर राहून लाखो लोक मनानेही कणखर बनले आहेत. पैशांच्या तंगीने कर्ज वाढले आणि जेव्हा उद्योग थांबला अनेकांचे संपूर्ण जग उध्वस्त झाले. लॉकडाऊन दरम्यान चित्रपटसृष्टीवरही भरपूर प्रमाणात पडसाद उमटले. कित्येकांचे काम ठप्प झाले. सेलिब्रिटीज त्यांच्या बचतीमुळे जगू शकले, पण कॅमेरामन, तांत्रिक कामगार, कनिष्ठ कलाकार या सर्वांचे आयुष्य मात्र यात भरडले गेले. सुचिस्मिता राउत्रेच्या बाबतीतही असेच घडले आहे.
सुचिस्मिता राउत्रे असं तिचं नाव. साल २०१५ मध्ये ती मुंबईत आली होती. जवळपास ६ वर्षांसाठी तिनं असिस्टंट कॅमेरा पर्सन म्हणून काम पाहिलं. पण, आता मात्र कटक येथे आईसोबत राहताना ती पूर्णपणे वेगळे दिवस पाहत आहे. लॉकडाऊनच्या आधी आपलं आयुष्य योग्य पद्धतीनं सुरु होत. मनाजोगं काम, बऱ्याच संधी तिला मिळत होत्या. पण, कोरोनाच्या संकटानं हे चित्र पालटलं.
अनेक मोठ्या निर्मिती संस्थांसाठी तिनं काम केलं. आज मात्र तिला कटकच्या रस्त्यांवर मोमोज विकावे लागत आहेत. सुचिस्मिता उराशी मोठी स्वप्ने बाळगून ओडिशाहून मुंबईला आली होती. पण, हे दुर्दैव आहे की ही मुलगी, कॅमेराच्या मागून झगमगाटी जग पाहणारी, आता केवळ दररोज ३०० ते ४०० रुपये मिळवण्यासाठी जीवाचे रान करते आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या रेसिपी शेअर करतही ती अर्थार्जनाचा एक नवा मार्ग अवलंबताना दिसत आहे.
सुचिस्मिताच्या घरी अर्थात कुटुंबात तिच्यासोबत आईशिवाय दुसरे कोणी नाही.
महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर सुचिस्मिताने ओडिया साइन इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली, बॉलिवूडमध्ये ओळख वाढली, मग हळूहळू काम मिळणे सुरू झाले. ती एक सहाय्यक कॅमेरा मॅन बनली. तब्बल ६ वर्षे तिने या क्षेत्रात कष्ट केले, नाव कमावले. परंतु, नंतर कोरोनाने तिच्या या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे.
सुचिस्मिताच्या वडिलांचे ती लहान असतानाच निधन झाले आहे. आई आणि सुचिस्मिताव्यतिरिक्त घरात दुसरी कोणीही व्यक्ती नाही. आईदेखील वयोपरत्वे वृद्ध झाली आहे, म्हणून ती घरीच राहते. सुचिस्मिता दिवसभर मोमोज बनवण्याची तयारी करते आणि संध्याकाळी मोमोज डब्यात भरून, ते विकण्यासाठी बाहेर पडते
आज ती कलाजगतापासून दूर आहे. कोरोनाचं संकट आलं, त्यावेळी तिच्याकडे घरी जाण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठीचेही पैसे नव्हते. त्यावेळी सलमान आणि अमिताभ बच्चन या कलाकारांनी तिला मदत केली होती. त्यांच्याच मदतीमुळं ती ओडिशाला आपल्या घरी पोहोचू शकली.