अरेरे… लंडनला जाऊन झाली संकर्षण ची अशी अवस्था, नेटकऱ्याना पडला प्रश्न..

छोटया पडद्यावरील माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतील संकर्षण कऱ्हाडे याची चर्चा नेहमीच सोहल मीडियावर होत असते. तो उत्तम अभिनेता तर आहेच, पण एक संवेदनशील कवी, निवेदक, लेखक, दिग्श्दर्शक म्हणूनही त्याने स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे. संकर्षणच्या कविता ऐकणं ही तर रसिकांसाठी पर्वणीच असते. तो ज्या कार्यक्रमांसाठी पाहुणा म्हणून जातो.

गेल्या वर्षभरापासून संकर्षण मालिका आणि नाटक यामध्ये खूपच बिझी होता. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील त्याची समीर ही भूमिका खूपच गाजली. या मालिकेतून संकर्षण पाच वर्षांनी मालिकेविश्वात परतला होता. अलीकडेच या मालिकेतील त्याचा शेवटचा सीन त्याने शूट केला. या मालिकेपूर्वी’देवा शपथ’मध्ये मुख्य भूमिकेत संकर्षण दिसला होता. यंदा मालिकेसोबतच तो ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात अभिनय करत आहे.

दरम्यान तो आता लंडनला गेला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने मुंबई एअरपोर्टवरील फोटो शेअर करत त्याच्या लंडन ट्रिपची माहिती चाहत्यांना दिली. अभिनेत्री प्राजक्ता माळीही संकर्षणबरोबर लंडनला गेली आहे.पण लंडनमध्ये जाताच संकर्षणचा अवतार काहीसा बदलला आहे. ज्याने त्याच्यावर काय ही वेळ आली अशी कॉमेंट नेटकरी करत आहेत.

नुकतेच प्राजक्तानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत ज्यात संकर्षणचा अवतार पाहून हसू आवरता आवारात नाहीये. त्याने चक्क अंगावरचा शर्ट काढून डोक्याला बांधलाय आणि असा संकर्षण पाहून सगळ्यांना हसू फुटणार नाही हेच नवल ठरेल. लंडनला जाऊन ही काय हालत करून घेतली असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.तशी तुफान चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

दरम्यान, संकर्षण जरा फारचं कुल आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. सोबत अभिनेत्री प्राजक्ता माळीही संकर्षणबरोबर धम्माल करताना दिसतेय.ऋषिकेश जोशी दिग्दर्शित नव्या सिनेमाच्या शुटींगसाठी संकर्षण लंडनला गेला आहे.संकर्षण बरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळी, आलोक राजवाडे आणि वैभव तत्त्ववादी या सिनेमात प्रमुख भूमिकेत असणार आहे. नुकताच सिनेमाचा मुहूर्त लंडनमध्ये पार पडला. याचा आनंद व्यक्त करत. त्याने हे फोटोज् शेयर केले आहेत.

सध्या संकर्षणच्या कवितेचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. खूप दिवसांनी कविता करतोय असं म्हणतच त्याने संवाद साधला आहे. बऱ्याच दिवसांनी त्याने कविता ऐकवण्यासाठी वेळ काढला आहे. कधी कधी सुचत नाही, कधी वेळ मिळत नाही तर कधी लिहावं असं वाटत नाही असंही त्यानं सांगितलं. मला जुळी मुलं आहेत आणि त्यांना मोठं होताना बाबा म्हणून मला काय वाटतं ही त्याची कविता जगातील प्रत्येक बाबाच्या मनातील भावना आहेत असंही तो सांगतो आहे.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप