या सुपरफूडसह करा तुमच्या दिवसाची सुरवात, होतील अनेक फायदे…
हिवाळ्यात दिवसाच्या सुरुवातीला पोट साफ न झाल्यास त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावर होतो. त्याचबरोबर पोट साफ न झाल्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. जर तुम्हीही सकाळी पोट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला काही पदार्थांची नावे सांगणार आहोत. हे पदार्थ रोज खाल्ल्याने तुमचे पोटही साफ होईल. यासोबतच तुम्हाला पिंपल्सपासूनही सुटका मिळेल आणि तुमची पचनक्रियाही चांगली होईल. जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ.
हिवाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकांना होतो. अशा स्थितीत नाश्त्यापूर्वी काही पदार्थांचे सेवन करावे. तुमच्या शरीरासाठी चांगले आणि भरपूर फायबर असलेले पदार्थ खा. हे पदार्थ खालीलप्रमाणे आहेत.
खजूर : खजूर तुमच्या पोटासाठी खूप चांगले मानले जाते. यासाठी 2 ते 3 खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी नाश्त्यापूर्वी सेवन करा. तुम्ही ते दूध किंवा कोमट पाण्यासोबतही घेऊ शकता.
मेथीच्या बियांची पावडर : तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीच्या बियांची पावडर कोमट पाण्यासोबत घ्या.
आवळा : बद्धकोष्ठता दूर करण्यासोबतच आवळा आरोग्याच्या अनेक समस्यांपासूनही बचाव करतो. आवळा सकाळी रिकाम्या पोटी खावा. जर बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त असेल तर आवळा जेवणात किंवा सूपमध्ये वापरू शकता.
गायीचे तूप : देशी गाईचे शुद्ध तूप पचनसंस्थेसाठी रामबाण औषधाचे काम करते. सकाळी दूध किंवा चहामध्ये गायीचे तूप मिसळून सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळेल.
बेदाणे: 5 ते 10 मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे तुमची बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल.
सूचना: वरील लेखातील माहिती हि संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असून ती इंटरनेटवर उपलब्ध आहे, त्यामुळे केलेल्या दाव्यांचा ‘nponlinenews.com’ चा काहीही संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घेणे खूपच आवश्यक आहे.