लाईमलाईट पासून दूर असणारा स्पृहा जोशीचा नवरा आहे तरी कसा ? पाहिलंय का?

0

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील कलाकारांच्या आयुष्यात नक्की काय घडतं असत याच चाहत्यांना नेहमीच कौतुक असत. सध्या अशाच एका फेमस सेलिब्रिटीच्या वैवाहिक आयुष्यात काय चालू आहे याचा एक अपडेट समोर आला आहे. मराठी सिनेमासृष्टी आणि छोटा पडदा गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी ही अभिनय, निवेदन, कविता या माध्यमांतून चाहत्यांच्या संपर्कात असते. आजवर ती तिचा नवरा वरद लघाटे याच्यासोबत कॅमेऱ्यासमोर खूप कमी दिसते अशी तक्रार तिचे चाहते करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

स्पृहा आणि तिच्या नवऱ्याचं नातं कसं आहे हेही आज या लेखात स्पष्ट होणार आहे.स्पृहा आणि वरद यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली. पुण्यातील एका विवाहसंस्थेच्या मंचावर घेण्यात आलेल्या मुलाखतीत स्पृहाने तिच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले.स्पृहा करियरच्या सुरुवाती दिवसात लोकसत्ताच्या संचालन विभागात इंटर्न म्हणून काम करत होती. तेव्हा तिचा नवरा संघात वरिष्ठ होता. एकदा भाषेच्या वापरावरून या दोघांत वाद झाले होते. मात्र त्यांना नंतर जाणवले की, आमचे निर्णय चुकीचे आहेत आणि आम्ही दोघेही आम्ही समजतो तितके वाईट नाही.

पण स्पृहा म्हणाली की, खरंतर जेव्हा वरदला पहिल्यांदा भेटले तेव्हा तो अजिबात आवडला नव्हता, पण भेटीतून तो जास्त कळाला.पाच वर्षे रिलेशनशीप आणि आता लग्नानंतरची आठ वर्ष एकत्र असूनही स्पृहा आणि नवऱ्याचे आजही खटके उडतात आणि त्याला एक कारण आहे. स्पृहाने हे कारणही या मुलाखतीत सांगितलं. जेव्हा स्पृहा लग्न करून वरदच्या घरी आली तेव्हा तिच्या वरदची नको ती सवय तिच्या लक्षात आली, तेव्हापासून आठ वर्ष ते याच कारणामुळे भांडतात.

पण जेव्हा स्पृहा असं सांगत असेल की ती तिच्या नवऱ्याशी रोज भांडते तर ऐकणाऱ्याना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे खरं आहे, स्पृहा एका कारणावरून नवऱ्याशी इतकं भांडते की आता त्याला काही सांगण्यापेक्षा तिने वैतागून एक निर्णय घेतला आहे.

याबाबत स्पृहा म्हणाली, लग्नानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी वरदचं कपाट उघडलं तेव्हा त्यात कसेही ठेवलेले कपडे बघून मला धक्काच बसला. एकाही कपड्याची घडी नव्हती. मला मात्र कपाट व्यवस्थित लावलेलं आवडतं. मी याबाबतीत तडजोड करू शकत नाही. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी अख्खं कपाट नीट लावत बसले होते. त्यानंतर मी वरदला कपडे नीट घडी करून ठेव असं सांगत राहिले पण त्याने काही ते ऐकलं नाही. यावरून आमची अगदी रोज भांडणं होतात. अखेर कपाट नीट ठेवण्याचं काम मी माझ्याकडेच घेतलं आणि वैतागून हा विषय सोडून दिला.

यावरून त्यांचे नाते अवखळ आहे हे लक्षात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.