के एल राहुलने अथियासाठी लिहिली खास पोस्ट.. म्हणाला “तुझ्या असण्याने..
सध्या वर्ल्ड कप क्रिकेट मॅच आणि के एक राहुल यांची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगत असताना दिसून तर आहे. दरम्यान आता टीम इंडिया चांगली खेळी खेळत असल्याने फॅन्स खूप खुश आहेत. आणि अशात के एल राहुल ने देखील एक पोस्ट करून आपली खुशी शेयर केली आहे. ती म्हणजे अथियाच्या वाढदिवशी तिला बर्थ डे विश करून..
बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आता ३० वर्षांची झाली आणि या सुंदर अभिनेत्रीसाठी दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिचा क्रिकेटर बॉयफ्रेंड केएल राहुलनेही इंस्टाग्रामवर जाऊन दोघांचे एकत्रित आणि गूढ चित्रांचे मिश्रण शेअर केले. तुम्हाला हसायला लावेल अशा कॅप्शनसह त्याने आपल्या गर्लफ्रेंडला विश केलं. तिला ‘माय जोकर’ म्हणत राहुलने लिहिले, “तुझ्या असण्यानं सर्वकाही छान होतं”,’ यावर तिने लव्ह यू कमेंट केले. हे फोटो त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत. त्यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. हा फोटो रिशेअर अथियाने इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. त्यावर तिने ‘बेस्ट बॉय’ असे इंग्रजीमध्ये लिहिले आहे.
वाढदिवसाच्या सुरुवातीला तिला वडील सुनील शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टी यांनी शुभेच्छा दिल्या. एका फंक्शन मधील फोटो पोस्ट करत सुनीलने पोस्टला, “हॅपी बर्थडे माय लाईफ ‘कॅप्शन देत अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
दरम्यान के एल राहुलचा परफॉर्मन्स आणि क्रिकेट सामना पाहण्यासाठी अथिया शेट्टी स्टेडियममध्ये हजर होती. तिच्या उपस्थितीचा सकारात्मक परिणाम केलच्या खेळावर झाला असे त्याचे चाहते सोशल मीडियावर म्हणत होते. सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि भारतीय फलंदाज केएल राहुल गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या नात्याला सुनीलने देखील मान्यता दिली आहे. मध्यंतरी ते लवकरच लग्न करणार आहे असे म्हटले जात होते.
२०१५ मध्ये अथियाने ‘हिरो’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘मुबारकां’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ अशा काही चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. एका कॉमन मित्राद्वारे त्यांची पहिली भेट झाली होती. पुढे त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. दरम्यान, पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात हे कपल विवाह बद्ध होईल अशा बातम्या समोर येत आहेत. यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दोघांपैकी कोणीही दिलेली नाही. याबाबत चे अपडेट्स देखील लवकरच मिळतील.