“मी तुला वचन देते कितीही उशीर झाला तरी..” पतीसाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट

झी मराठीवरील ‘चल हवा येऊ द्या’ या कॉमेडी शो मधून अनेक विनोदवीर आपल्या भेटीला येत असतात. या शो मुळे यातील बऱ्याच कलाकारांना आज लोकप्रियता मिळाली आहे. भाऊ कदम,सागर कारंडे,भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, निलेश साबळे यांच्याबरोबर अभिनेत्री श्रेया बुगडेही या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे आणि सोशल मीडियावरही टी नेहमी सक्रिय असते. अनेकदा श्रेया तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या कामाचे अपडेट देत असते. अनेकदा तिच्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या तिने शेयर केलेला एक फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे.

श्रेया बुगडेने तिच्या लग्नाचा ८ वा वाढदिवस साजरा करत तिने पतीसाठी खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमधून श्रेयाने पतीला शुभेच्छा खास दिल्या आहेत. श्रेया बुगडेची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत तिला लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

श्रेया बुगडेने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिलं, “मी तुला वचन देते की तुझ्या सलूनच्या अपॉइंटमेंट्स नेहमी बुक करेन, जसं आपण ठरवलं त्याप्रमाणे काहीतरी पाहत तिसऱ्या मिनिटाला झोपून जाऊ, तुला किंवा मला कितीही उशीर झाला तरीही तुझे कपडे मीच निवडेन. किमान सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण बनवून तुला खाऊ घालेन. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मी कायमच तुझे सूर्यास्त आणि बीच पार्टनर असेन. लग्नाच्या ८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

दरम्यान त्यांच्या नात्याबद्दल श्रेया म्हणाली, ‘माझी आणि निखिलची ओळख एका मालिकेच्या निमित्ताने झाली. त्या मालिकेत माझी छोटीशी भूमिका होती पण या मालिकेचा निर्माता म्हणून निखिल काम बघत होता. एक कलाकार आणि निर्माता म्हणून अनेकदा आमच्या शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. त्या गोष्टी आठवल्या तर आमची मैत्रीच काय तर आमचं लग्न झालं यावर कधीकधी माझा विश्वासच बसत नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

‘एकदा निखिलने निर्मिती केलेल्या प्रोजेक्टला पुरस्कार मिळाला होता आणि मी त्याचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला. त्या एका फोनने आमच्यातील भांडण आणि मतभेद, गैरसमज दूर झाले. जो काही वाद होता तो मतभिन्नता असल्यामुळे होता हे आम्हाला दोघांनाही कळलं. हे आधी आम्ही लक्षातच घेत नव्हतो. त्यानंतर आम्ही भेटायला लागलो अधिकाधिक जाणून घेतल्यानंतर आमच्या दोघांच्या लक्षात आलं की आम्हाला एकमेकांविषयी काहीतरी खास भावना वाटत आहेत. आणि मग एका पॉईंटवर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप