साऊथचा लो बजेट सिनेमा पडला बॉलिवूड सिनेमावर भारी.. हिंदी सिनेमाला करावी लागतेय तारेवरची कसरत
सध्या बॉलिवूडमध्ये हिंदी सिनेमांची गाडी डब घाइला आल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ मोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटांनासुद्धा आता प्रेक्षकांचा अतिशय थंड प्रतिसाद काहीतरी वेगळंच चित्र दाखवत आहे.
या आठवड्यात दोन मोठ्या बॉलिवूड स्टार आमिर खान आणि अक्षय कुमारचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर येऊन धडकले आहेत. आमिरचा लाल सिंग चड्ढा तर अक्षयचा रक्षाबंधन हा सिनेमा रिलीज झाला आहे. अशा दोन दिग्गज बॉलिवूड कलाकारांचे सिनेमे मोठ्या पडद्यावर असताना देखील साऊथच्या छोट्या बजेटची फिल्म भाव खाऊन जाताना दिसत आहेत.
आमिर आणि अक्षयचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर थंड कामगिरी करत असताना साऊथचा ‘सीता रामम’ सिनेमा एकदम दमदार कामगिरी करताना दिसत आहे. साऊथ स्टार दालक्वेरीन सलमान, अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि रश्मिका मंदानाचा हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून सिनेमा चांगला गल्ला जमवताना दिसत आहे. सीता रामम ही एक सुंदर प्रेमकथा असून यामध्ये मृणाल ठाकूर या सिनेमाच्या माध्यमातून तेलगू चित्रपट सृष्टीत पदार्पण करते आहे. यामध्ये दालक्वेरीन आणि मृणाल यांची जोडी सुद्धा प्रेक्षकांना चांगलीच आवडली असून सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सीता रामम हा एक पिरियड ड्रामा आहे. ज्यामध्ये १९६० सालचीलव्हस्टोरी दाखवण्यात येत आहे.ज्यात एक आर्मी ऑफिसर आणि त्याच्या आयुष्यात निनावी चिठ्ठीतून आलेली मुलगी यांच्यातील प्रेमकहाणी दिसून येत आहे. सिनेमाचं बजेट हे तीस करोडच्या आसपास होतं असं समोर आलं आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने ५० करोडचा गल्ला कमावला असल्याचं सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
एकीकडे बॉलिवूडच्या सिनेमांना बॉयकॉट करायची मागणी सुद्धा जोर धरत असल्याने त्याचा परिणाम सिनेमांवर होत आहे. जिथे साऊथचे सिनेमे पन्नास कोटींचे आकडे सहज गाठत आहेत तिकडे बॉलिवूडच्या सिनेमांना कमाई करण्याडतही तारेवरची कसरत करावी लागत आहेत.
दालक्वेरीन सलमानने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट लिहिली आहे जी चांगलीच व्हायरल झाली.
View this post on Instagram
, “तेलुगूमध्ये डब केलेला आणि रिलीज झालेला माझा पहिला चित्रपट ओके बंगाराम होता. मणी सरांचे आभार, तुम्ही सर्वांनी माझ्यावर संधी घेतली आणि माझ्या पहिल्या आउटिंगमध्ये मला खूप प्रेम दिले. मग, नागी आणि वैजयंती यांनी मला महानतीमध्ये मिथुनची भूमिका करण्याची संधी दिली आणि त्यात ग्रे शेड्स असूनही, भूमिकेसाठी आणि चित्रपटासाठी मला जे प्रेम आणि आदर मिळाला तो माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळा होता. अम्मादी माझ्या आयुष्याचा कायमचा भाग मी बनलो. कानुलु कानुलानु डोचायंते आणि कुरुप हे चित्रपट डब झाले होते, तरीही तुम्ही त्या चित्रपटांना दिलेले प्रेम मी कधीही विसरणार नाही.”