दक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या हनिमुनचे फोटोज् झाले व्हायरल..

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा ९ जून रोजी विवाहबंधनात अडकली.नयनताराने दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली.पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीने नयनतारा-विग्नेशचे लग्न थाटामाटात पार पडले.विवाहबंधनात अडकल्यानंतर नयनतारा-विग्नेशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

नयनतारा पती विग्नेशसह हनिमूनसाठी थायलंडला पोहोचली आहे.हनिमूनचे काही फोटो नयनताराने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by nayanthara🔵 (@nayantharaaa)

या फोटोंमध्ये नयनताराने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.नयनतारा-विग्नेशचा रोमँटिक फोटो…या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे. नयनतारा-विग्नेश गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

महाबलिपुरम येथे एका शानदार हॉटेलमध्ये नयनतारानं विग्नेशसोबत सातफेरे घेतले. आता या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी अवघं टॉलिवूड आणि बॉलिवूड एकत्र येणार आहे. नयनतारा हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील वलयांकित नाव. नयताराने आत्तापर्यंत तामिळ, तेलुगु, मल्याळम अशा ७५ चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by nayanthara🔵 (@nayantharaaa)

मल्याळम चित्रपट मनसिनक्करे मधून नयनतारानं २००३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर हिट चित्रपटांबरोबर तिची प्रेमप्रकरणंही गाजली. यामुळे नयनतारा हे नाव दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये कायम प्रकाशझोतात राहिलं. तिचं नाव तिच्या चित्रपटांमुळे, अभिनयामुळे आणि प्रेमप्रकरणांमुळेही बरेच गाजले आहे.

नयनतारानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात अभिनेता सिलंबरासन राजेंदर सोबतचं तिचं नातं गाजलं. मात्र दुबई येथील एका चित्रीकरणादरम्यान या दोघांचे खाजगी फोटो सोशल मिडीयावर आले आणि त्यातूनच हे नातं दुरावलं. यानंतर नयनताराच्या आयुष्यात अभिनेता प्रभुदेवाची एंट्री झाली.

सन २००८ मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांनीही गुप्तपणे विवाह केल्याच्या बातम्याही आल्या. प्रभुदेवा नयनताराच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्यानं तिच्या नावाचा टॅटूही काढला. अर्थात नयानताराचेही प्रभुदेवावर प्रेम होते. त्यामुळेच ख्रिश्चन असलेल्या नयानतारानं २०११ मध्ये हिंदू धर्माचा स्विकार केला. मात्र या प्रेमप्रकणात प्रभुदेवाची पत्नी, लता मध्ये आली. प्रभुदेवाला घटस्फोट द्यायला तिने नकार दिला. तसंच मुलांची जबाबदारीही प्रभुदेवा घेत नसल्याचा आरोप तिनं केला. लतानं प्रभुदेवाविरोधात कोर्टात धाव घेतली. ही केस खूप गाजली होती.

त्यानंतर नयनताराच्या आयुष्यात साल २०१५ मध्ये विग्नेश या चित्रपट दिग्दर्शकाची एन्ट्री झाली. सात वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विग्नेश हा प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक असून त्याचा कथुवाकुला रेंडुकधल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात विजय सेतुपति, नयनतारा आणि समंथा मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय विग्नेशचा O2 हा चित्रपट १७ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. यातही नयनतारा प्रमुख भूमिकेत आहे. याबरोबरच नयनतारा आणि विग्नेश आगामी एके 62 या चित्रपटाचं चित्रीकरण करत असून, हा चित्रपटही लवकरच मोठ्या पडद्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप