साउथ मधील सुपरस्टार महेश बाबूचं मराठी ऐकलं का तुम्ही?

साउथचा सिने इंडस्ट्री मध्ये धुमाकूळ घालणारा एक सुपरस्टार म्हणजे महेश बाबू! आपल्या लाघवी चेहऱ्याने आणि उत्तम अभिनयाच्या बळावर महेश बाबू प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. आतापर्यंत साउथ मधील वेगवेगळ्या सिनेमांमधून काम करत महेश बाबुने प्रेक्षकांच्या मनात आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

 

म्हणूनच आज फक्त साउथ मध्येच नाही, तर संपूर्ण जगभरात त्याचे लाखो करोडो फॅन्स आहेत! म्हणजेच त्याची फॅन फॉलोईंग प्रचंड मोठी आहे! महेश बाबूने आता वयाच्या ४७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. नुकतच काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या फॅमिली सोबत आपला ४७ वा वाढदिवस सेलिब्रेट केला.

महेश बाबू आणि त्याची बायको नम्रता शिरोडकर ही जोडी साउथ सिनेसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध जोड्यांमधील एक आहे. महेश बाबू आणि नम्रता या जोडीच्या लव स्टोरी बद्दल बोलायचे झाल्यास सुप्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिला पाहताक्षणी पहिल्या भेटीतच महेश बाबू तिच्या प्रेमात पडलेला.

हे क्युट कपल आपापल्या सोशल मीडिया हँडल वरून कित्येक वेळा एकमेकांसोबतचे फोटो एकत्रितपणे शेअर करताना दिसतात. नम्रताने सध्या सिने इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतलेला आहे,, परंतु असे असले तरी ती सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहे. आपल्या इन्स्टा हँडल वर ती तिचे वेगवेगळ्या लूक मधील फोटोज आणि व्हिडिओज कायमच शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वी नम्रताने तिच्या इन्स्टा हँडल वरून ‘ask me anything’ असा प्रश्न विचारत आपल्या फॅन्स सोबत संवाद साधलेला.

यावेळी तिला तिच्या फॅन्सने खूप सारे वेगवेगळे प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील तिने अगदी बिनधास्तपणे दिली. यावेळी तिच्या चाहत्यांकडून तिला तिच्या पर्सनल लाईफ, तिची प्रोफेशनल लाईफ, तसेच महेश बाबू यांच्या बद्दल देखील बरेच प्रश्न विचारण्यात आले.

यावेळी तिला तिच्या एका फॅनने प्रश्न विचारला की,
“महेश बाबू मराठी मध्ये बोलू शकतात का?” या प्रश्नावर देखील तिने फॅन्टॅस्टिक उत्तर दिले. नम्रता यावेळी म्हणाली की “माझी सुद्धा फार इच्छा आहे. परंतु माझ्या दोन्हीही मुलांना मराठी येते. त्यासोबत त्यांना इंग्रजी आणि तेलुगु भाषा देखील येते.”

महेश बाबू आणि नम्रता या दोघांनीही एकमेकांना लग्न करण्या अगोदर चार वर्ष एकमेकांना डेट केलं आणि अखेर १० फेब्रुवारी २००५ रोजी या लव बर्ड्सचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता नम्रता आणि महेश बाबू यांचा परिवारामध्ये त्यांच्या दोन मुलांचाही समावेश झालेला आहे. सितारा आणि गौतम ही त्यांची नावे आहेत.

Leave a Comment

Close Visit Np online