या कारणामुळे विभक्त झाले होते सोहेल खान आणि पत्नी सीमा सजदेह, अखेर कारण आले समोर..

0

अभिनेता आणि दिग्दर्शक सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सजदेह यांच्या घटस्फोटाच्या बातमीने खान कुटुंबीयच नाही तर त्यांच्या चाहत्यांना ही धक्का बसला होता. पण आता त्यांच्या घटस्फोटाचे कारण समोर आले आहे. नुकतीच सीमा सजदेहने नुकतीच ‘फॅब्युलस लाईफ्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स 2’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने सोहेल खानशी घटस्फोट का घेतला, याचा खुलासा केला. शोच्या सुरूवातीला सीमाने तिच्या घराबाहेरची ‘खान’ आडनावाची नेमप्लेट हटवली आणि केवळ सीमा आणि निर्वाण आणि योहान या दोन्ही मुलांची नावं असलेली नवी पाटी लावली. यावरूनच सोहल व सीमा यांच्यात आता काहीही उरलेलं नाही, हे स्पष्ट झालं.

याच शो दरम्यान, त्यांचं नातं का संपुष्टात आले अदा प्रश्न विचारल्यावर कदाचित मला मुलींमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून.., असं सीमा म्हणाली. तिचं हे उत्तर ऐकून सर्वानाच धक्का बसला. पण नंतर सीमाने आपण मस्करी करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिने आपल्या घटस्फोटाचं खरं कारण सांगितलं.

आमच्या विचारात फारच अंतर होतं. आमचे विचार अजिबात पटत नव्हते. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही विभक्त राहत होतो. आपला लहान मुलगा हे सर्व समजून घेण्यासाठी फारच लहान होता. पण मोठा मुलगा निर्वाण आमच्या निर्णयाशी सहमत असल्याचं ती म्हणाली. सीमा सजदेह आणि सोहेल खान यांनी १९९८ मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नाच्या तब्बल २४ वर्षानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे.

अगदी सिनेमॅटिक पद्धतीने प्रेमात पडून प्रेम सफलंकरून दाखवणाऱ्या या जोडीची लव्हस्टोरी सुंदर आहे. पण आज सोहेल आणि सीमा एकमेकांसोबत रहायला तयार नाहीत पण २४ वर्षापूर्वी चित्र खूप वेगळं होतं. तेव्हा ही जोडी एकमेकांशिवाय राहू शकत नव्हती. फॅशन डिझायनर बनण्यासाठी सीमा सचदेव ही दिल्लीहून मुंबईला आली होती. प्रसिद्ध फॅशन डिझायनर असलेली सीमा अभिनेता चंकी पांडे याची नातेवाईक आहे. चंकी पांडे याच्या साखरपुड्याच्या पार्टीत सोहेल आणि सीमा यांची ओळख झाली. मैत्रीतून प्रेम फुललं. सोहेल हा मुस्लीम तर सीमा हिंदू. याच कारणामुळे सीमाच्या कुटुंबीयांकडून सोहेलशी लग्नाला खूप विरोध होता.सीमाचं सोहेलला भेटणं बंद केलं होतं.

सीमा आणि सोहेलला त्यांच्या प्रेमापुढे धर्म, घरच्यांचा विरोध यांची काहीच फिकीर नव्हती. घरातून पळून जात त्यांनी लग्न करायचं ठरवलं. सोहेल सीमाला पळवून घरी घेऊन आला. तेव्हा वडील सलीम खान यांनाही सुरुवातीला धक्का बसला. पण त्यांनी विरोध केला नाही. म्हणाले, सीमा या घरात राहील पण त्यासाठी निकाह करावा लागेल. त्यासाठी मध्यरात्री साडेतीन वाजता मौलवींचं अपहरण करून सोहेल आणि सीमाने निकाह केला होता. निकाहानंतर हिंदू रिवाजाप्रमाणेही दोघांचं लग्न झालं.

Leave A Reply

Your email address will not be published.