मित्रहो सर्वत्रच राजकारणीय वातावरण जाणवत असते, शिवाय आता हे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे यातील अनेक नेत्यांकडे जनतेचे उत्तम लक्ष असून निरीक्षण देखील वाढले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या सह आता २० हुन अधिक आमदार गुवाहाटीला गेले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नारायण राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केले आहे. ट्विट करता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. यावेळी ते भाष्य करतात की “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास,नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.”
सोशल मीडियावर हल्ली चर्चेला प्रचंड उधाण आले आहे, अनेक नवनवीन विषय किंवा जुनेच विषय नव्याने खेचले जात आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला किंवा त्यापाठीमागे काय कारण होते यावर अनेकांचे प्रश्न हजेरी लावत आहेत. ही चर्चा सुरू असतानाच राजकीय क्षेत्रातील एकनाथ शिंदे हे नाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे त्यामुळेच “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे” हा नवा प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट पुन्हा एकदा भलताच चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य होते त्यामुळे त्यांच्या शिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही.
“धर्मवीर..” चित्रपट गेल्याच महिन्यात पडद्यावर झळकला आहे, त्यामध्ये आनंद दिघे यांचा मृत्यू अपघाती कारणाने झाला असल्याचे दाखवले आहे. यातील हा शेवटचा सिन पुन्हा एकदा लक्षवेधी ठरत आहे. या सिन मध्ये आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांच्या अगदी जवळची माणसे, कार्यकर्ते यांच्या अश्रूंना अनावर होऊन ढाळताना दिसत आहेत. दरम्यान हे सर्व सुरू असतानाच एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीला आनंद दिघे कशामुळे गेले ? असा प्रश्न विचारलेल दाखवलं आहे. यावर तो कार्यकर्ता हार्ट अटॅकने गेले असे म्हणतो, यावर पुन्हा तो व्यक्ती “कोणी सांगितलं ? असंही म्हणतो” हे सर्व डॉक्टरांनी सांगितलं असल्याचे तो कार्यकर्ता म्हणतो.
मग पुन्हा तो व्यक्ती “तुम्ही रिपोर्ट पाहिले का?” अस विचारतो. सात वाजेपर्यंत साहेब बरे होते…असे म्हणत कार्यकर्त्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहताना दिसतो. हा सिन इथे संपतो आणि तेव्हाच प्रवीण तरडे यांचा आवाज येतो ” काय चाल्लात ? आनंद दिघेंची गोष्ट इथेच संपली नाही, पुन्हा भेटू लवकरच” त्यामुळे हा सिन चर्चेचा विषय बनत असून या चित्रपटाचा पुढील भाग येईल का, आणि येणार असेल तर तो कधी येईल यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत असून प्रेक्षकांच्यात उत्सुकता निर्माण झाली आहे.
हा चित्रपट खूप काही सांगतो, शिवाय एका सत्यवादी नेत्याची जीवनगाथा आख्या महाराष्ट्राला जाणवून देतो. त्यामुळे हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय व प्रसिद्ध झाला असून अनेकजण यावर अजूनही चर्चा करताना दिसतात. सोशल मीडियावर देखील सर्वत्र राजकीय वातावरण निर्माण झाले असून चर्चेत देखील तेच वातावरण आहे.तर मित्रहो तुम्ही देखील सहपरिवार हा चित्रपट नक्की पहा, तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा आणि जर लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.