छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेली दिसत आहे. ‘अनन्या’ या सिनेमा पाठोपाठ हृताचा आता ‘टाईमपास 3’ हा सिनेमा देखील प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटांमध्ये प्रचंड बिझी होताच हृताने टीव्हीवरील काही प्रोजेक्ट्सला राम राम केला आहे. त्यामुळेच विविध महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट सोडल्यामुळे सध्या ह्रताला भरपूर ट्रोल करण्यात येत आहे.
View this post on Instagram
दरम्यानच एक मोठी बातमी आली आहे ती म्हणजे, हृताची ‘मन उडू उडू झालं’ ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यासोबतच हृताने ‘दादा एक गुड न्यूज’ हे नाटकही सोडलं आहे. सलग एवढ्या मोठ्या दोन्ही प्रोजेक्ट मधून बाहेर निघाल्यामुळे हृताला आता सोशल मीडियावर लोकांनी भरपूर ट्रोल करायला सुरुवात केली होती. याच दरम्यान हृताने आपला पती प्रतीक याच्या सांगण्यावरून हे दोन्ही मोठे प्रोजेक्ट सोडल्याचा आरोपही नेटकऱ्यांनी त्याच्यावर केला होता. आता या सगळ्या चर्चेवर हृता रिऍक्ट झाली आहे. तिच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये वारंवार तिच्या नवऱ्याचं उगीचच नाव घेतल्या येत असल्यामुळे तिने या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं म्हणाली तरी काय हृता?
‘मला मुळातच रोलिंग हा प्रकार आवडत नाही तुम्ही ज्या व्यक्तीवर भरभरून प्रेम करता, त्याच्याबद्दल एखादी गोष्ट वाचून तुम्ही कसे व्यक्त होता? खरी गोष्ट माहित नसताना एखाद्याला ट्रोल करून ही चांगलं गोष्ट नाही.
View this post on Instagram
मागील काही दिवसांपूर्वीच मन उडू उडू झालं ही मालिका बंद होणार अशी चर्चा रंगली होती, त्यानंतर मी ‘दादा एक गुड न्यूज’ या नाटकांमध्ये सुद्धा नसेल याबाबतची बातमी सुद्धा सगळ्यांना समजली आणि यानंतर लोकांनी मला ट्रोल करायला सुरुवात केली. माझ्या नवऱ्याने सांगितले म्हणून मी प्रोजेक्ट सोडते, असं काय काय लोक म्हणाले, पण मी सांगू इच्छिते की असं काहीही नाही! माझा नवरा प्रतीक माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा व्यक्ती आहे हे खरं आहे. पण म्हणून तो माझें निर्णय घेत नाही. गेली दहा वर्षे मी अपार कष्ट घेत माझं करिअर घडवलं आहे. त्यामुळे सरसकट असा काहीही निष्कर्ष काढण्याआधी चाहत्यांनी विचार करायला हवा. माझा चाहता वर्ग इतका असंवेदनशील असावा असं मला वाटत नाही’ असं हृता यावेळी म्हणाली.
ऋता व प्रतीक हे दोघेही १८ मे या दिवशी लग्न बंधनात अडकले होते. त्यावेळी त्यांच्या लग्नावरून सुद्धा हृताला बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रियांना तोंड द्यावं लागलं होतं.