मराठी चित्रपट सृष्टीने आजवर प्रेक्षकांना धुरंधर कलाकार दिले आहेत. ज्यांच्या जिवंत अभिनायने चित्रपटाला लोकप्रियता मिळाली आहे. अशी किती नावे घेतली तरी ती यादी इतकी मोठी आहे की त्याचा हिशोब लावणे जवळजवळ महाकठीण काम.. पण त्यातले एक नाव असे आहे जे कितीही काळ लोटला तरी ताजेतवाने वाटते. ते नाव म्हणजे अलका कुबल..
अभिनय आणि अलका कुबल यांचे नातेच मुळी जुने आहे. सर्वांना माहीतच आहे की, अलका कुबल या मराठीतील प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या अनोख्या अंदाजाने चाहत्यांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकांमध्ये काम करणाऱ्या अलका कुबल यांनी मराठी चित्रपटांमध्ये मोठी ओळख निर्माण केली आहे. मराठी सिने सृष्टीत एक उत्कृष्ट सून म्हणून त्यांची निर्माण झालेली ओळख आजतागायत तशीच आहे. आजही त्यांचा चित्रपटातील अभिनय पाहिला की डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही.
अलका कुबल यांनी इयत्ता दहावीत असताना ‘चक्र’ या मराठी चित्रपटात एक लहान भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.अलका कुबल यांना ‘माहेरची साडी’ या चित्रपटातून त्यांचा प्रचंड प्रसिद्धी आणि लोकांचे प्रेम मिळाले. त्यानंतरच अनेक चित्रपटात त्यांना सूनेचीच कामं मिळत गेली. पण याशिवाय त्यांनी साकारलेली काळूबाई आजही कोणी विसरू शकत नाही.
अलका कुबल यांच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं तर त्यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या वीक पॉईंटचा उल्लेख केला होता.एका मुलाखतीमध्ये अलका यांनी सांगितलं होतं की, ‘काठपदरच्या साड्या’ हा त्यांचा वीक पॉईंट आहे. त्यांना अशा साड्या प्रचंड आवडतात.
प्रत्येक सणाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला त्या आवर्जून काठपदरच्या साड्या नेसण्याला प्राधान्य देतात.तसेच अलका कुबल यांच्याकडे पैठणी आणि कांजीवरम साड्यांचं मोठं कलेक्शन असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, बराच काळ रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला होता. मध्यंतरी ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत त्या झळकल्या.त्यानंतर आता पुन्हा त्या रुपेरी पडद्याकडे वळल्या आहेत.लोकेश गुप्ते दिग्दर्शित “CONGRATULATIONS” या आगामी चित्रपटात अलका कुबल झळकणार आहेत.या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये पार पडले. या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांनी ‘चार दिवस सासूचे’, ‘वहिनीची माया’ अशा भन्नाट चित्रपटात आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.