बिग बॉस सिझन ४ ची पत्रकार परिषद पार पडली.. तरीही अनेक गोष्टी आहेत गुलदस्त्यात..

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर केवळ या शोचीच चर्चा आहे.बिग बॉस मराठी च्या चौथ्या पर्वासंदर्भात बोलण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील बिग बॉस महेश मांजरेकरांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. तरी त्यांच्या खासगी आयुष्यात आलेल्यावादळाबद्दल ते या पत्रकार परिषदेत बोलले.

चौथ्या पर्वाची टॅगलाइन ‘ऑल इज वेल’ अशी आहे. विकासनं मांजकरेकरांना तुमच्या आयुष्यातील ‘ऑल इज वेल’चा क्षण कोणता होता? असा प्रश्न विचारला. यावर मांजरेकरांनीही त्यांच्याच शैलीत उत्तर देत म्हणाले, ऑपरेशनमधून बाहेर आलो तो क्षण माझ्या साठी ऑल इज वेल होता, असं मांजरेकरांनी सांगितलं. तब्बल १५ तास ऑपरेशन सुरू होतं. त्यामुळं जेव्हा डोळे उघडले, तेव्हा ऑल इज वेल असं वाटल्याचंही त्यांनी सांगितलं.

महेश मांजरेकरांच्या नव्या लुकबद्दलही सूत्रसंचालकाने प्रश्न विचारला. यावर मांजरेकर म्हणाले की, गेल्या पर्वात पर्याय नव्हता. नुकताच केमो थेरेपी घेऊन आलो होतो. केमो थेरेपीमुळे माझे केस गेले होते. आले ते कुरळे आले होते. अनेक लोक मला कुरळ्या केसांबद्दल विचारतात. त्यासाठी केमो करावी लागेल, असं मी सांगतो… असं हसत हसत मांजरेकरानी उत्तर दिले.

टेलिव्हिजनवरील सर्वांत वादग्रस्त शो बिग बॉस शो ओळखला जातो. दरम्यान, घरातील संभाव्य स्पर्धकांची नावं देखील समोर आली पण प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेला बिग बॉसचा चौथा सीझन नक्की कधी सुरू होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वच आतूर होते. येत्या २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकर हा शो होस्ट करणार आहेत. नुकताच बिग बॉस मराठी सीझन४ चं टायटल साँग रिलीज करण्यात आलं. आधीच्या ३ सीझनपेक्षा यंदाचं टायटल साँग खूपच हटके आहे. एकदम ‘यो स्टाईल’मध्ये या साँगचं चित्रीकरणही करण्यात आलेलं आहे

तर हा शो बिग बॉस मराठी हा शो महाराष्ट्राच्या घराघरात पाहिला जातो. मनोरंजन, राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी या खेळात एकत्र येतात.या सीझनमध्ये अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये निशिगंधा वाडे, उत्कर्ष शर्मा, शिवलीला पाटील, विशाल निकम, आविष्कार दारव्हेकर, अक्षत वाघमारे, गायत्री दातार, नेहा जोशी, मीनल शाही, सुरेखा कुडची, सई रानडे, आनंद इंगळे, विकास पाटील, संतोष चौधरी, ऋषी साहू आणि ऋषी साहू यांचा समावेश आहे. बिग बॉस मराठी सीझन ४ ची प्रेक्षक खूप उत्सुकतेने वाट पाहात आहेत. हा सिझन नक्कीच भन्नाट असेल नाही का?

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप