‘मैने प्यार किया’ फेम भाग्यश्री पटवर्धनची बहिण देखील आहे सुंदर अभिनेत्री..जाणून व्हाल थक्क.

0

‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने बॉलीवूडला एक उत्कृष्ट असा अभिनेता तर दिलाच शिवाय सालस आणि सुंदर अशी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री पटवर्धन सुद्धा दिली. भाग्यश्री ही खुद्ध सांगलीची नुसती कन्याच नाहीतर राजकन्या आहे. श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन हे भाग्यश्रीचे वडील सांगली संस्थानात त्यांना मानाचे स्थान आहे तर रोहिणी पटवर्धन या भाग्यश्रीच्या आई.भाग्यश्री, मधूवंती आणि पूर्णिमा या त्यांच्या तीन सुकन्या आहेतm या तिन्ही मुलींचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले.त्यामुळे बालपणापासून अभिनयाची आवड असलेल्या भाग्यश्रीने पुढे जाऊन बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख बनवली.

तिने मैने प्यार किया सोबतच थलाईवी, झक मारली बायको केली, देवा, रेड अलर्ट अशा तामिळ ,कन्नड, भोजपुरी चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या चुणूक दाखवली. पण तुम्हाला माहित आहे का? भाग्यश्रीची धाकटी बहीण पूर्णिमा पटवर्धन ही देखील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. अभिनयासोबतच ती उत्तम गायिका देखील आहे हे बहुतेकांना ओळखीचे नसावे.

चाईल्ड आर्टिस्ट असणाऱ्या पूर्णिमा पटवर्धनने १९८८ सालच्या शशी कपूर यांच्या हम तो चले परदेस या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले होते. तिने या चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केले होते. याच चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिने गाणे देखील गायले होते. कच्ची धूप या गाजलेलता मालिके मध्ये भाग्यश्री आणि पूर्णिमा पटवर्धन दोघीही बालकलाकार म्हणून एकत्रित झळकल्या होत्या. या दोघींवर चित्रित झालेले गाणे स्वतः पूर्णिमाने गायले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyashree (@bhagyashree.online)

लहानपणापासूनच पूर्णिमाने चित्रपट, मालिकांसाठी गाणी गायली आहेत. पुढे कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगचे वेध तिला लागले. फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेमध्ये तिने उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता. काही ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग करत असताना २००३ साली ‘ ताज महल अ मूव्हमेंट ऑफ लव्ह’ या चित्रपटात तिने मुमताज महलची प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने बॉलिवूड अभिनेता रघु राज सोबत स्क्रीन शेअर केली होती.

बालकलाकार म्हणून आणि बालगायिका म्हणून नावारूपाला आलेली पूर्णिमा कालांतराने या क्षेत्रापासून दुरावली असली तरी आजही ती आपली गाणं गाण्याची हौस पूर्ण करताना दिसते. स्वतःच्या युट्युब चॅनलवर पूर्णिमा गाणी गात असते.ज्याचे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत. या दोघी बहिणींनी सध्या युट्यूब वर चांगलीच धमाल माजवली आहे. भाग्यश्रीचे देखील हेल्दी टिप्स चे युट्यूब चॅनल उत्तमरित्या चालते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.