माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतील सिम्मी काकीचा नवा लूक आला समोर…अशा रुपात पाहून व्हाल थक्क
‘माझी तुझी रेशमगाठ’ या मालिकेत नेहा आणि यशचे लग्न झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेचे प्रेक्षक या क्षणाची वाट पाहत आहेत. सरतेशेवटी, रविवारच्या विशेष प्रसंगी त्यांचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मोठ्या संकटाना पार करत आता कसाबसा नेहा आणि यशच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आहे. पण यामध्येही नेहाच्या पहिल्या नवऱ्याने विरजण टाकायचे ठाणले आहे. आणि त्यात त्याला सिम्मी काकी साथ देत आहे. आपले छक्के पंज्याचे डाव टाकत आजवर सिम्मी काकीने बऱ्याच वेळा नेहाला त्रास दिला आहे. पण आता तिचे सत्य नेहसमोर आले आहे.
नेहाच्या वहिनीनं अखेर नेहाला खरं काय ते सांगितलं. यशच्या मिथिला काकीनंही नेहाला सिम्मीपासून सावध राहायला सांगितलंय. तिचे सगळे कारनामे तिनं समोर आणले. यानंतर नेहानं सिम्मीला चांगलच ठणाकावले आहे. आणि पुन्हा असं काही केलंत तर परिणाम चांगले होणार नाहीत, असं सांगितलं. पण गप्प बसेल ती सिम्मी कुठली? याचा बदला म्हणून तिनं अजून एक डाव आखलाय. हे सर्व पाहण्यात प्रेक्षकांना अधिक रस येतो आहे.
दरम्यान, मालिकेत सिम्मीचं काम करणाऱ्या शीतल क्षीरसागरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ती एका वेणीत, साध्या साडीत दिसतेय. यामागचं कारण काय, हे लवकरच कळणार आहे. आजोबांमुळे सिम्मीला पॅलेस सोडून साधं राहावं लागतंय की काय, हे समोर येईलच. प्रेक्षकांची मात्र उत्सुकता वाढली आहे.
View this post on Instagram
मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. बऱ्याच अडचणी आणि गैरसमजांवर मात करत यश आणि नेहा यांनी त्यांचा संसार सुरू केला आहे. आता यश आणि नेहा यांच्यातील रोमँटिक सीनही प्रेक्षकांना सुखावत आहेत. एकीकडे यश आणि नेहा एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहेत आणि सोबतच घर आणि ऑफिसची जबाबदारी सांभाळत आहेत. तर दुसरीकडे नेहाचा पहिला नवरा अविनाश तिच्या आयुष्यात पुन्हा आला आहे पण नेहाला याची अजून कल्पना नाही. परीचा ड्रायव्हर म्हणून त्याने पॅलेस मध्ये एंट्री केली आहे.
मात्र आता या मालिकेचा एक नवा प्रोमो रिलीज झाला असून अविनाशचा चेहरा अखेर नेहाच्या समोर येणार आहे. ज्यामध्ये नेहा अचानकपणे त्याच्या घरी येते आणि त्याला पाहते. यामुळे आता अविनाश आणि सिम्मी एकत्र येऊन काय नवीन कारस्थान रचतात ? आणि त्यांचा कट सफल होतो की उधळला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.