पत्नीसाठी लिहिलेली सिद्धारर्थची ती पोस्ट झाली व्हायरल.. म्हणाला “हे तुलाही माहिती आहे आणि मलाही..”

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चा सुरू असतानाच तृप्तीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नावात बदल केला. तिनं जाधव हे आडनाव काढून टाकलं आहे. त्यामुळं चर्चेला आणखी उधाण आलं आहे. असं असलं तरीही सिद्धार्थनं या सर्व अफवा असल्याचंही म्हटलं आहे.

सोबतच त्याने सोशल मीडियावर शेयर केलेली एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. त्याने ही पोस्ट खास पत्नी तृप्तीसाठी लिहिली आहे. ज्यामुळे सध्या त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांना पूर्णविराम मिळेल का? अशी चर्चा देखील नेटकऱ्यांमध्ये होते आहे.

“सिद्धू ते सिद्धार्थ जाधव हा प्रवास तुझ्यामुळे आणखी सुखकर झालाय आणि प्रवास अजूनही तुझ्या सोबतीने सुरू आहे . आणि मी हा प्रवास आत्मविश्वास करू शकतो कारण तू माझ्यासोबत आहेस. मी अभिमानाने सांगत असतो की माझ्या आयुष्याचा बॅक बोन माझी बायको आहे. आणि ते शंभर टक्के खरं आहे.घर, संसार, इरा, स्वरा, यांना सांभाळण्यापेक्षा ही “मला” सांभाळणं खूप कठीण आहे हे तुलाही माहितीये आणि मलाही.”

असं म्हणत सिद्धार्थनं त्याच्या आयुष्यातील तृप्तीचं स्थान अधोरेखित केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सिद्धार्थच्या बायकोनं तृप्ती अक्कलवार हिनं सोशल मीडियावरून जाधव हे आडनाव काढून टाकलं आहे. त्यामुळे सिद्धार्थ आणि तृप्ती वेगळे होणार का अशी दबक्या आवाजात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मटा ऑनलाइनला दिलेल्या प्रतिक्रियेत सिद्धार्थने या सर्व गोष्टींचा स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. तसेच या फक्त अफवा आहेत, आमच्यात सारंकाही आलबेल असल्याचं त्याने सांगितलं होतं. परंतु सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे.

सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच चर्चा होतेय असं नाहीय. यापूर्वी देखील अनेकदा दोघं चर्चेत आले आहेत. पण त्याची कारणं वेगळी होती. कपल गोल्स देणारं जोडपं म्हणून दोघांकडं पाहिलं जात होतं. दोन वर्षांपूर्वी तृप्तीच्या वाढदिवसाला सिद्धार्थनं एक पोस्ट शेअर करत तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्या नात्याबद्दल या चर्चा सुरू असल्या तरी सिद्धार्थ त्याच्या लेकींसोबत नुकताच दुबईला गेला होता. त्याच्यासोबत तृप्ती देखील होती. पण दोघांचा एकत्र फोटो मात्र पाहायला मिळाला नाही. सिद्धार्थ आणि तृप्ती यांनी अद्यापही यावर बोलणं टाळलं आहे. आता यांच्या नात्याच गुलदस्त्यात लपलेलं सत्य जाणून घेण्यासाठी चाहते आणखीच उत्सुक आहेत.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप