सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्तीने चालू केला नवा व्यवसाय, सोशल मीडियावरती झाले भरभरून कौतुक.
मराठी आणि हिंदी चित्रपसृष्टीत आपल्या कॉमेडी ने सर्वांना लोट पोट करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. तो अलीकडेच आपला नवाकोरा दे धक्का २ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे. त्यामुळे तो बराच चर्चेत राहिला. पण त्याआधी ही तो चर्चेत होता याचे कारण त्याचे वैयक्तिक आयुष्य निगडित होते. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती अकलवार यांच्यातील मतभेद इतके निकोपाला गेले की शेवटी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी नेटकऱ्यांच्या चर्चेला कारण मिळाले होते. दरम्यान, त्या दोघांचेही वक्तव्य, सोशल मीडिया पोस्ट इतक्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या की त्यांचा हिशोब अजूनही होतो आहे.
पण तृप्ती आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. दरम्यान, तिने सिद्धार्थ जाधवचे आडनाव सोशल मीडिया अकाऊंटवरून हटवले होते. तृप्ती अकलवार अशी स्वतःची नवी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तिने नवे पाऊल उचलले आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
तृप्ती आता स्वतःचा कपड्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करत आहे. ‘स्वira’ असं तृप्तीच्या ब्रॅण्डचे नाव आहे.उद्योजीका श्वेता शिंदेसह तृप्तीने हा व्यवसाय सुरु केला आहे.तृप्तीला फॅशन डिझाइनिंगमध्ये रस आहे.नेटकऱ्यांनी तृप्तीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.तृप्ती आणि सिद्धार्थने २००७ साली लग्नगाठ बांधली होती त्यांना स्वरा आणि इरा या दोन गोंडस मुली आहेत. ज्यांचे फोटोज् सिद्धार्थ नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर करत असतो. स्वरा आणि इरा या त्यांच्या मुलींच्या नावावरून तृप्तीने ब्रॅण्डचं नाव ठेवलं आहे.तृप्ती याआधी नोकरी करायची
सिद्धार्थ आणि तृप्ती झलक दिखला जा या शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये तृप्ती आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.सिद्धार्थ आणि तृप्ती यांचा प्रेमविवाह झाला आहे. तब्बल ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यांची लव्हस्टोरी फारच खास आहे. ज्यावेळी रामभरोसे नाटकासाठी तृप्तीने ऑडिशन दिली तेव्हा ती पत्रकारिता शिकत होती. तिने उत्कृष्ट ऑडिशन दिले. सिद्धार्थला ती पहिल्या भेटीतच आवडली होती. तिचे ऑडिशन चांगले असल्याने त्याने तिला अभिनयाबद्दलही विचारले होते. पण तिने नकार दिला होता.
View this post on Instagram
त्यानंतर पुढे ४ ते ५ दिवसात सिद्धार्थला तिच्याबद्दल प्रेम वाटू लागले.ते दोघेही एलफिन्स्टन स्टेशनवर उतरायचे. त्यावेळी सिद्धार्थने स्टेशनजवळ भर गर्दीत तिला लग्नाची मागणी घातली. सिद्धार्थला आपण आवडतो, याची तिला कल्पना होती. पण तो प्रपोज करत थेट लग्नाची मागणी घालेल असे तिला वाटले नव्हते. पण अखेर नाही नाही करत तिने त्याला होकार दिला आणि ५ वर्षे रिलेशशिपनंतर त्यांनी लग्न केले.