घटस्फोटा संबंधित पसरलेल्या अफवा ऐकून ‘सिद्धार्थ जाधव’ बोलला बायकोबद्दल असं काही…

मराठीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव हा वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहतो. गेल्या काही महिन्यांपासून सिद्धार्थ जाधव आणि त्याची बायको तृप्ती हे दोघेही एकमेकांपासून घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या पेव फुटलं होतं. या अशा अफवांमुळे सिद्धार्थ आणि त्याच्या परिवाराला खूपच मनस्ताप झाला असल्याचेही वृत्त समजत आहे.

 

दरम्यानच्या काळात काही महिन्यांपूर्वी तो दुबई येथे फिरण्यासाठी गेला होता, त्यावेळेस तो त्याच्या दोन मुलांसोबत होता. मात्र त्याची पत्नी त्याच्यासोबत फोटोत दिसत नव्हती. या कारणामुळे तो डायव्हॉर्स घेणार की काय? अशी चर्चा रंगली होती. यावर त्याने मीडियाला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान या सर्व प्रकरणाबाबतचा खुलासा केला आहे.

आत्तापर्यंत सिद्धार्थ अनेक मराठी सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका करत झळकला आहे. याचबरोबर त्याने हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केल आहे. सिद्धार्थ जाधव हा आपल्या भन्नाट विनोदाच्या टाइमिंग साठी ओळखला जातो. यापूर्वी सिद्धार्थने ‘अगबाई अरेच्चा’ ‘जत्रा’ ‘टाईम प्लीज’ या सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर त्याचा मकरंद अनासपुरे सोबतचा दे धक्का हा सिनेमा देखील भरपूर गाजला होता.

सिद्धार्थ जाधवने काही लोकप्रिय हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केल आहे. गोलमाल आणि गोलमाल रिटर्न या सिनेमांमध्ये देखील तो दिसला होता. तसेच रोहित शेट्टीच्या सिम्बा या सिनेमात सुद्धा तो महत्वपूर्ण भूमिका निभावताना दिसलेला. या सर्व वातावरणात सिद्धार्थ जाधव याने त्याच्या सोशल मीडिया हँडल वरून नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे आणि हा फोटो शेअर केल्यानंतर थोड्याच वेळात भरपूर व्हायरल देखील झाला आहे.

या फोटोमध्ये सिद्धार्थ सोबत दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक प्रभुदेवा दिसत आहेत. प्रभुदेवा यांच्यासोबत फोटो शेअर करताना सिद्धार्थने खाली असे लिहिले आहे की,

“एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत आपण भविष्यात चित्रपटात काम करू हे कधीही विचार करू शकत नाही. मला ती संधी मिळाली आणि मी ती संधी कधी सोडत नाही. यावर माझा विश्वास बसत नाहीये की लहानपणी मी प्रभुदेवा यांच्या ‘हमसे है मुकाबला’ या सिनेमाचे पोस्टर असलेले दप्तर घेऊन शाळेत जात होतो, मात्र भविष्यामध्ये याच दिग्दर्शकासोबत मला काम करण्याची संधी मिळेल असे मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते! दप्तराचे स्वप्न जिवंत होऊन समोर येईल याची मी कल्पनाच केली नव्हती” असे तो यावेळी म्हणाला.

एका मुलाखती दरम्यान सिद्धार्थने सांगितले की “माझ्या पडत्या काळात मला माझ्या पत्नीने फार मदत केली आहे. तृप्ती माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे आणि कायमच राहील!” अशी प्रतिक्रिया देत त्याने तृप्ती सोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम दिलेला आहे.

Leave a Comment

Close Visit uttamsheti