शो संपला पण रेशीमगाठ राहणार कायम.. काय आहे श्रेयसच्या या पोस्टचा अर्थ?

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने अनेक प्रेक्षकांची मने जिंकत प्रत्येकाला ही मालिका पाहण्यासाठी भाग पाडले. या मालिकेची हृदयस्पर्शी कहाणीने चाहत्यांना अक्षरशः भुरळ घातली होती. सोबतच ही मालिका टीआरपी रेसमध्ये नेहमीच टॉप ५ मध्ये राहिली आहे. मालिकेतील चिमुकली परी ही प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण ठरली. कित्येकदा प्रेक्षकांनी कॉमेंट केले आहे की ते फक्त परीसाठी मालिका पाहत होते. मात्र आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

दरम्यान, २२ जानेवारी रोजी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. मालिका संपली म्हणून मालिकेचा चाहतावर्ग नाराज झाला पण आता मालिकेतील लाडक्या यशने चाहत्यांना खुशखबर देत एक नवी घोषणा केली आहे. श्रेयसने आपली रेशीमगाठ कधीच तुटणार नसल्याचं म्हटलं आहे. काय आहे ही खुशखबर जाणून घ्या.

श्रेयसने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रेक्षकांना गुड न्यूज दिली की, श्रेयस लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पोस्टमध्ये मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे काही सीन शेयर केले आहेत. सुरुवातीपासून ते अलीकडच्या काही भागांमधील सीन आणि फोटो या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

पोस्ट शेयर करत असताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की,शो संपतोय….आपलं नात नाही….आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे…वर्षानुवर्ष…कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ….फक्त तुमच्यासाठी….आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय….*Picture* अभी बाकी है मेरे दोस्त….कुछ समझे??”,

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

प्रार्थनाने सुद्धा याच सेम कॅप्शनसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. श्रेयस व प्रार्थनाने लिहिलेल्या या कॅप्शनमुळे मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.श्रेयसने दिलेलं कॅप्शन काळजीपूर्वक वाचलं असेल तर एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात येते की, *Picture* हा शब्द. या शब्दावरून कदाचित नेहा व यशची लोकप्रिय जोडी लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल का? हा प्रश्न उभा राहतो पण याबाबत श्रेयसने अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. पण नेमकं प्रकरण काय आहे, ते लवकरच कळेलच.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. श्रेयसला पुन्हा एकदा पाहता येणार म्हणून प्रेक्षक खुश आहेत.श्रेयसच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत त्याचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिनेदेखील ‘व्वा सर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका युझरने लिहिलं, ‘तुम्हाला पाहण्यास आम्ही सगळेच आतुर आहोत.’ अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप