कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात श्रेयस तळपदे दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, आला First Look समोर..

0

अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या दबंग अंदाजामुळे नेहमी चर्चेत येत असते. कोणत्याही मुद्द्याला थेट उत्तर देणाऱ्या कंगणाने आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने अनेकांना भुरळ पाडली आहे. एक अभिनेत्री म्हणून तिने फिल्म जगताला हेलावून सोडलेच आहे. पण ती आता नव्याने सर्वांना भेटणार आहे. ती आता एक निर्माती म्हणून नवी सुरुवात करू पाहते आहे. तिचा हा नवा निर्णय चाहत्यांना ही खूप रूचला आहे. पाहूया कोणता सिनेमा घेऊन ती प्रेक्षकांना भेटायला येत आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘इमर्जन्सी’या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. याच सिनेमाच्या माध्यमांतून कंगना निर्माती म्हणून पदार्पण करत आहे. जसं की आपल्याला माहीत आहे,माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ साली देशात आणीबाणी लागू केली होती. याच घटनेवर आधारित बॉलिवूडचा बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

सोबतच मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे या चित्रपटात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.अभिनेत्री महिमा चौधरी या चित्रपाटात पुपुल जयकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहे.अभिनेता मिलिंद सोमण या चित्रपटात सॅम मानेकशॉ यांची साकारताना दिसणार आहेत.इमर्जन्सी’ या चित्रपटाची निर्मिती कंगना रणौतने केली आहे.कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली असल्याचे टीझरमधूनच स्पष्टपणे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

दरम्यान, चित्रपटातील कलाकारांचा लुक शेअर करताना, कंगणाने लिहिले, “गतिमान मिलिंद सोनमला #Sam Manekshaw च्या रूपात सादर करत आहे, जो भारत-पाक युद्धादरम्यान भारताच्या सीमा वाचवणारा माणूस आहे आणि ज्याची सेवा त्याच्या प्रामाणिकपणाइतकीच वैशिष्ट्यपूर्ण होती; एक मोहक, एक युद्ध नायक आणि #आणीबाणीतील दूरदर्शी नेता.” मिलिंद सोमण यांनीही शेअर केले.

भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत इंस्टाग्रामवर आपल्या पात्राचा पहिला लूक शेयर करत मिलिंदने लिहिले, “कंगना राणौतच्या दिग्दर्शन #Emergency चा एक भाग होण्याचा आणि #Sam Manekshaw ची भूमिका साकारल्याबद्दल गौरव आहे, ज्याने आपल्या बुद्धिमत्तेने आणि शौर्याने भारताला 1971 च्या भारत-पाक युद्धात विजय मिळवून दिला!”

देशातील महत्वपूर्ण पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी कलाकार सज्ज झाले आहेत. आणि प्रेक्षकही खूपच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप