मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचा लाडका मराठमोळा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे! श्रेयस कायमच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत अभिनयाबाबत नवनवे प्रयोग करताना दिसतो। सध्या तो टेलिव्हिजनवर यशवर्धन चौधरी म्हणून गाजतच आहे, पण येणाऱ्या आगामी काळात श्रेयस पुन्हा एकदा बॉलीवूडचा मोठा पडदा देखील गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे! श्रेयस च्या चाहत्यांना तो पुन्हा एकदा बॉलीवूड मधील नवीन सिनेमातून एक आगळी वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे.
इंदिरा गांधींच्या जीवनावर आधारित असलेल्या इमर्जन्सी या सिनेमात कंगना राणावत ही इंदिरा गांधींनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे तर आणि आपला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे देखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
View this post on Instagram
नुकतीच कंगना राणावतनी तिचे सोशल मीडिया हँडल वरून तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. या सिनेमामध्ये कंगना भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा इंदिरा गांधीं वरील बायोपिक नसून इतिहासातील महत्वपूर्ण घटनेवर हा सिनेमा आधारित असणार आहे.अभिनेत्री कंगना राणावत स्वतःच दिग्दर्शित करत असलेल्या या सिनेमांमध्ये श्रेयसची भूमिका नेमकी कशी आणि काय असेल याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही, पण यामध्ये तो एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे एवढं नक्की!
श्रेयस तळपदेचा कायमच नाविन्यपूर्ण भूमिका करण्याकडे कल राहतो, म्हणूनच तो चित्रपट, टेलिव्हिजन सगळ्या माध्यमांवर गाजताना दिसतो! काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘कौन प्रवीण तांबे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमाला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सध्या श्रेयस झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत यशच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच पुष्पा चित्रपटातील त्याने केलेल्या हिंदी डबिंगने तर देशभरात धुमाकूळ घातला होता!!
श्रेयस सध्या ‘आपडी-थापडी’ या त्याच्या मराठी सिनेमा मध्ये काम करत असून आगामी ७ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होणार आहे. या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे सह अभिनेत्री मुक्ता बर्वे, नंदू माधव, संदीप पाठक आणि नवीन प्रभाकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. श्रेयस फक्त एक अभिनेता नाही तर उत्तम दिग्दर्शक देखील ठरला आहे, पोस्टर बॉईज हा बहुचर्चित प्रसिद्ध चित्रपट श्रेयसनच दिग्दर्शित केला होता!
श्रेयसच्या इमर्जन्सी या चित्रपटात तो निभावत असणारी भूमिका अजून गुलदस्त्यात आहे, परंतु त्याच्या फॅन्सना मात्र त्याची भूमिका कोणती असेल याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे!