झुकेगा नहीं म्हणत बिग बॉसच्या घरी घेतली श्रेयसने एंट्री… मालिकेला ठोकला रामराम?
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या केमिस्ट्री ने चाहत्यांना अक्षरशः वेडे केले. सोबतच मालिकेतील चिमुकल्या परीने सर्वांना लळा लावला. दरम्यान ही
मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार म्हंटल्यावर मालिकेच्या निर्मात्यांना प्रेक्षकांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. आणि केवळ त्यांच्या आग्रहाखातर मालिका पुन्हा सुरू करण्यात आली आहे. फक्त या मालिकेची ऑन एअर जाण्याची वेळ बदलण्यात आली आहे. मालिका पुन्हा सुरू झाल्यानं कलाकारांनाही जबरदस्त आनंद व्यक्त केला होता. पण मालिकेतून एक कलाकार कमी होणार आहे की काय असा नवा प्रश्न चाहत्यांसमोर उभा राहिला आहे.
सोशल मीडियावर नुकताच येऊ घातलेल्या बिग बॉसच्या एका प्रोमो मुळे हा प्रश्न उभा राहिला आहे. या प्रोमो मध्ये दिसून येत आहे की माझी तुझी रेशीम गाठ फेम अभिनेता श्रेयस तळपदे बिग बॉस मराठीच्या घरात आला आहे. बिग बॉसमध्ये आल्यानं श्रेयसने माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून एक्झिट घेतली का? या प्रश्नाने सर्वांना वेढले आहे. मात्र श्रेयसनं याची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
बिग बॉस मराठीच्या या चौथ्या सीझनची प्रेक्षकांनी अगदी आतुरतेनं वाट पाहिली आहे. याबाबत दररोज नवनवीन चर्चा नेट कऱ्यांमध्ये रंगत होत्या. शोचे होस्ट ते शो मध्ये नक्की कोण सहभागी होणार इथवर या चर्चा अगदी रोज केल्या जात होत्या. आणि अखेर २ ऑक्टोबर ला हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि १६ स्पर्धकांच्या साथीने सुरू झाला बिग बॉसच्या घरातील हा रंजक खेळ..
View this post on Instagram
दरम्यान खेळाला सुरुवात झी असता श्रेयसने त्याचाच हटके अंदाजात बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. त्याने ‘झुकेगा नही साला’, म्हणत अभिनेत्रा श्रेयस तळपदे एंट्री घेताना दिसून येत आहे.
श्रेयस तळपदेच्या येण्याने शोमध्ये काय हंगामा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.दरम्यान, हा प्रोमो रिलीज होताच चाहत्यांनी मात्र श्रेयस नक्कीच प्रमोशनसाठी आल्या असल्याचे म्हटलं आहे. श्रेयसचा नवा सिनेमा आपडी धापडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आणि याच सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी श्रेयस आल्याचं म्हटलं जात आहे.दरम्यान, श्रेयसला घरात पाहून बाकी स्पर्धकांची काय प्रतिक्रिया असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आता श्रेयस नक्की स्पर्धक म्हणून घरात आलाय की सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे बिग बॉसच्या आगामी भागात कळेलच.