अबब.. श्रेया बुगडे कडे आहेत चक्क इतक्या चप्पलच्या जोड…आकडा ऐकून थक्क व्हाल

0

झी मराठी वाहिनीवर सध्या अनेक नव्या मालिकांची रेलचेल वाढली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. मनोरंजक आणि तितकाच रंजक असा हा कार्यक्रम अल्पावधीत लोकप्रिय बनतो आहे.

सध्या हा कार्यक्रम चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये येणाऱ्या प्रत्येक महिला सेलिब्रेटी आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत रंजक खुलासे करतात. सोबतच सुबोध भावे त्यांना विविध मजेशीर आणि काही गंभीर प्रश्नसुद्धा विचारतो. यावरील त्यांची उत्तरे ऐकण्यात प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. दरम्यान शोमधील काही महिला कलाकारही सेलेब्रेटींना आगळेवेगळे प्रश्न विचारतात इतकंच नव्हे तर या सेलेब्रेटींना शोमध्ये विविध मजेशीर खेळही खेळावे लागतात.

सध्या ‘बस बाई बस’चा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री-कॉमेडियन श्रेया बुगडेनं या नवनवीन प्रश्नांची उत्तरे देतात दिसून येत आहे. अभिनेत्री श्रेया बुगडेने ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रियता संपादन केली आहे. श्रेयाच्या कॉमेडीचे आणि तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. यशोमुळे श्रेयाला अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे बस बाई बसच्या मंचावर श्रेयाला बघून प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या नव्या प्रोमोमध्ये श्रेयाने आपल्या खाजगी आयुष्यातील एका गोष्टीचा खुलासा केला आहे. शोमध्ये श्रेयाबाबत अनेक खुलासे झाले. श्रेयाला शॉपिंगची अतिशय आवड आहे. विशेषत: बॅग्ज आणि गॉगल्स तिचा जीव की प्राण. प्रत्येक ड्रेसवर ती वेगळी बॅग तर घेते शिवाय प्रत्येक ड्रेसवर वेगळ्या ग्लासेस म्हणजे गॉगलही घालते. श्रेयाचं हे गॉगल आणि बॅग प्रेम आता सर्वांनाच परिचीत झालं आहे. बस बाई बसच्या मंचावर श्रेयाला एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावरील तिच्या उत्तराने सर्वच थक्क झाले आहेत. यावेळी श्रेयाला विचारण्यात आलं होतं की, तिच्याजवळ चप्पलचे किती जोड आहेत? यावर उत्तर सेट श्रेयाने सांगितलं, माझ्याकडे २०० चप्पलचे जोड आहेत. या उत्तराने सुबोधसह सर्वांनीच तोंडात बोटं घातली.

अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तू तिथे मी’, ‘अस्मिता’, ‘फू बाई फू’ अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही नाटकं सादर केली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप