रोहित ठरला क्रिकेटच्या मैदानातील शिवराज सिंग चौहान; आपल्यांनीच सोडली साथ! वाचा सविस्तर…| Shivraj Singh

Shivraj Singh भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या चाहत्यांची शुक्रवारी (16 डिसेंबर) चांगलीच निराशा झाली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच विजेतेपद जिंकले.

 

पण आगामी हंगामासाठी याच रोहितच्या बदल्यात हार्दिक पंड्याला याला मुंबईचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले आहे. अनेकांच्या मते रोहिसोबत अन्याय झाला असून सध्याच्या राजकीय परिस्थितीशी त्याचीय बरोबरी करत आहेत.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझीने आयपीएल 2024 (IPL 2024) साठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला 15 कोटी रुपयांमध्ये ट्रेड केले. हार्दिक मागच्या दोन हंगामांमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार राहिला होता. त्याने आयपीएल 2022 मध्ये गुजरातला विजेतेपद, तर मागच्या हंगामात म्हणजे 2023 मध्ये उपविजेतेपद मिळवून दिले.

पण आपला जुना संघ मुंबई इंडियन्सकडून बोलावणे मिळाल्यानंतर त्याने पुन्हा तत्काळ हा प्रस्ताव स्वीकारला आणि गुजरातची साथ सोडली. दुसरीकडे मुंबईसाठी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या चाहत्यांना हा निर्णय जराही पटला नाही, असेच दिसते. चाहते फ्रँचायझीच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

देशात सध्या राजकीय वारे वाहत आहेत. नुकत्याच देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका पार पडल्या. भाजवणे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात सत्ता मिळवली. तर तेलंगणामध्ये कॉग्रेस, मिझोराममध्ये झेपीएम या स्थानिक पक्षाने बाजी मारली.

मध्यप्रधेशचे मुख्यमंत्रीपद अजूनही चर्चेचा विषय बनून आहे. 2005 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र बनणारे शिवराज सिंग चौहान चार वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री बनले. यावेळीही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून ते दावेदार होते. पण भाजप पक्षश्रेष्टींकडून मुख्यमंत्रीपदाची माळ मोहन यादव यांच्या गळ्यात पडली.

मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांच्याकडे पाहून भाजपला मतदान करणाऱ्यामध्ये पक्षाने मोहन यादवांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर नाराजी पाहायला मिळत आहे. अनेकजन शिवराज सिंग चौहान आणि रोहित शर्मा यांची सोशल मीडियावर तुलना करत आहेत. या दोघांसोबत अन्याय झाल्याचे बोलले जात आहे.

अगदी अशीच स्थिती शुक्रवारपासून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची झाली आहे. रोहित शर्मा याचे कट्टर चाहते हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सबाबत उगडपणे टीका करताना दिसत आहेत. पाच वेळा मुंबईला ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या रोहितच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो देखील केले आहे. 24 तासांच्या आतमध्ये मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम खात्याच्या चाहत्यांमध्ये काही लाख चाहत्यांची घट झाली आहे. अनफॉलो करणाऱ्यांचे प्रमाण अद्याप घटताना दिसत नाहीये.

दरम्यान, हार्दिक पंड्या मुळचा मुंबई इंडियन्सचाच आहे. 2015 मध्ये त्याला मुंबईकडून आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली होती. पुढच्या काही हंगामांमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केले आणि भारतीय संघात स्थान मिळवले.

असे असले तरी, आयपीएल 2022 पूर्वी फ्रँचायजीने अष्टपैलूला रिलीज केले आणि लिलिवात देखील खरेदी करू शकले नाहीत. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघ नव्याने सहभागी झाला असून त्यांनी हार्दिकला 15 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.

हार्दिक पुढे या संघाचा कर्णधार बनला आणि पहिल्याच हंगामात गुजरातला विजेतेपद मिळवून दिले. कर्णधार म्हणून दुसऱ्या हंगामात देखील हार्दिकला यश मिळाले, असे म्हणता येईल. कारण त्याचा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. चेन्नई सुपर किंग्जने मात्र अंतिम सामन्यात गुजरातला पराभूत केले.

Leave a Comment

Close Visit uttamsheti