शिल्पा शेट्टीची बहीण पुन्हा सिंगल, राकेश बापट सोबत शामिता शेट्टीने केले ब्रेकअप….

0

मित्रहो सोशल मीडियावर रोज अनेकांच्या बातम्या कानावर पडत असतात. खास करून प्रेमवेड्या जोड्या चर्चेत येत असतात. अलीकडेच एक खास जोडी लक्ष वेधून घेत आहे. फिल्म इंडस्ट्री मधील हे एक लोकप्रिय कपल आहे, अनेकांना यांच्या प्रेमाचे अनुकरण करावेसे वाटते. हे प्रसिद्ध कपल म्हणजेच शामिता शेट्टी आणि राकेश बापट आहेत. त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते मंडळी नेहमीच उत्सुक असतात. शामिता आणि राकेशची लव्हस्टोरी खूपच गोड गोड आहे. प्रीतीच्या विळख्यात अडकलेल्या या पाखरांनी आता मात्र घरट्यातून झेप घेतली आहे.

अगदी काहीच वेळापूर्वी अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर ब्रेकअपची घोषणा केली आहे. ते दोघे बिग बॉस ओटीटी वेळी एकत्र आले होते. या रियालिटी शोमध्ये ते दोघे जवळ आले होते, त्यावेळी त्यांची भेट झाली होती आज तिथूनच या जोडप्याच्या नात्याला सुरुवात झाली होती. शामिता आणि राकेश हे दोघेही सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतात, हे क्युट कपल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सोबतच त्यांचे आकर्षक फोटो सुद्धा व्हायरल होत असतात.

आता सुद्धा त्यांचे बरेच फोटो व्हायरल होत असून शामिता आणि राकेश पुन्हा चर्चेत आले आहेत. हे फोटो एका म्युजिक व्हिडीओचे आहेत, याबद्दल शमिताने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर पूर्ण माहिती दिली आहे. ही पोस्ट शेअर करत ती म्हणते “मला अस वाटत हे स्पष्ट करणं फार गरजेचं आहे. मी आणि राकेश आता एकत्र नाही आहोत आणि बरेच दिवसापासून न्हवतो. पण हा सुंदर म्युजिक व्हिडीओ आमच्या चाहत्यांसाठी आहे. ज्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं आहे आणि आशीर्वाद दिले. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आमच्यावर असलेल प्रेम असच ठेवा.

इथून पुढे येणाऱ्या नव्या क्षितिजांची आणि सकारात्मकतेची अपेक्षा ठेऊया. सगळ्यांना भरपूर प्रेम आणि कृतज्ञता” शमिताचे हे मत समोर येत असतानाच राकेशने सुद्धा आपली इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत मत मांडल आहे. तो म्हणतो “मी या माध्यमातून करू इच्छितो की मी आणि शमिता आता एकत्र नाही आहोत. नियतीने चुकीच्या वेळी आम्हाला एकत्र आणण्याचे ठरवले. आमच्यावर भरभरून प्रेम केलेल्या शरा फॅमिली आणि फॅन्सचे खूप आभार. मी एक प्रायव्हेट व्यक्ती असल्याने मला या ब्रेकअप बद्दल फारशी वाच्यता करायची न्हवती.

पण आमच्या चाहत्यांचा विचार करून मी ही घोषणा करायचं ठरवलं. मला कल्पना आहे याने तुम्हाला दुःख होईल आणि वाईट वाटेल पण आशा करतो की आम्हा दोघांवर तुम्ही असच प्रेम कायम करत रहाल. हा म्युजिक व्हिडीओ तुम्हा सर्वांसाठी आहे.” राकेश आणि शमिता दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. दोघेही आपापल्या मार्गावर यशस्वी होत राहोत ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप